नागपूरात गडकरींनी 2 लाखाहून अधिक मतांने गड राखला

0
14

नागपूर दि.२४:: विजयासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या उमेदवारांना आपली अनामतही वाचविता आलेली नाही. नागपूर लोकसभेत २८ उमेदवारांची तर रामटेकमध्ये १४ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली.नागपुरात ३० उमेदवार रिंगणात होते. भाजपाचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी यांनी काँग्रेसचे नाना पटोले यांना पराभूत केले. अखेरीच्या फेरीनंतर( ईव्हीएम व पोस्टल) गडकरींना ६ लाख 60 हजार २2१ इतकी तर कॉंग्रेसचे नाना पटोले यांना ४ लाख 44 हजार 212  इतकी मते मिळाली. या अखेरच्या फेरीनंतर गडकरी सुमारे २ लाख १6 हजारांहून अधिक मताधिक्याने विजय मिळविला.काँग्रेसचे उमेदवार वगळता रिंगणातील उर्वरित २८ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. बसपाचे मोहम्मद जमाल व बहुजन वंचित बहुजन आघाडीचे सागर डबरासे यांनाही आपली अनामत राखता आली नाही. कही अपक्ष उमेदवारांना तर अत्यल्प मते मिळाली आहेत. अनेकांना पाचशेचाही टप्पा गाठता आला नाही.
रामटेकमुळे शिवसेनेचे कृपाल तुमाने यांनी पुन्हा गड राखला. काँग्रेसचे किशोर गजभिये यांना पराभवाला सामोरे जावे लागले. येथे गजभिये वगळता उर्वरित १४ उमेदवारांची अनामत जप्त झाली. बसपाचे सुभाष गजभिये व वंचित बहुजन आघाडीच्या किरण रोडगे -पाटणकर यांनाही अनामत वाचविता आली नाही.

गडकरी यांच्या विजयाचे संपूर्ण श्रेय त्यांच्या विकासकारणाला जात असून नागपुरात झालेल्या विकासकामांची पावती मतदारांनी मतांच्या रुपात त्यांना दिलेली आहे. निवडणूक प्रचाराच्या काळात पटोले यांनी गडकरींवर व्यक्तिगत टीकादेखील केली होती. मात्र गडकरी यांनी टीका करण्यापेक्षा आपली कामे जनतेपर्यंत पोहोचविण्यावरच भर दिला. मागील पाच वर्षांत केंद्रात काम करत असतानादेखील मतदारांशी कायम राखलेला जनसंपर्क, कार्यकर्त्यांशी जुळलेली नाळ आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मतदारसंघातील वेगवान विकासकामे ही गडकरी यांच्या विजयाची प्रमुख कारणे ठरली.

पटोले सन्यास घेणार का चर्चांना उधाण- पहिल्याच फेरीत गडकरी यांनी आघाडी घेताच मतमोजणी केंद्रावर पटोले-महाजन यांच्यातील आव्हानाची चर्चा रंगली. पटोले आता राजकीय संन्यास घेतील का, असा चिमटा भाजपा कार्यकर्ते काँग्रेस कार्यकर्त्यांना घेऊ लागले. नागपूरसह राज्याच्या राजकीय वर्तुळातही याचीच चर्चा रंगली होती. आपण शब्दावर कायम राहणारे नेते आहेत. बोलतो तसेच करून दाखवतो. वैयक्तिक नफा-नुकसानीचा विचार करीत नाही, असे पटोले नेहमी सांगतात. आता पटोले त्यांनीच जाहीरपणे दिलेल्या शब्दावर कायम राहून राजकीय संन्यास घेतात का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
पटोलेंनी राजकीय संन्यास घेऊ नये- गडकरी- लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पटोले यांनी नितीन गडकरी यांच्यावर बरीच आगपाखड केली. वेळोवेळी त्यांना लक्ष्य केले. शेवटी गडकरींचा एकतर्फी विजय झाला. गिरीश महाजनांचे आव्हान स्वीकारून पटोले फसले. मात्र, त्यानंतरही गडकरी यांनी संयमी भूमिका घेतली. प्रसारमाध्यमांशी बोलताना गडकरी म्हणाले, निवडणूक प्रचारादरम्यान अभिनिवेशात अशाप्रकारे अनेक गोष्टी बोलल्या जातात आणि त्याला काही महत्त्व नाही.नाना पटोले यांनी राजकीय संन्यास घेऊ नये. निवडणुकीत जय-पराजय होतच असतो. त्यामुळे पटोले यांनी तसा विचार करू नये. भारताची लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे आणि जनतेचा कौल स्वीकारणे हेच लोकशाहीसाठी चांगले आहे. गडकरी यांनी अशी भूमिका घेत राजकारणात व्यक्तिद्वेष नसावा, असा संदेश दिला.

महाराष्ट-नागपुर
परिणाम
क्रम संख्या अभ्यर्थी दल का नाम ई.वी.एम. मत डाक द्वारा मत कुल मत % मत
1 नाना पटोले इंडियन नेशनल कांग्रेस 442765 1447 444212 37.45
2 नितीन जयराम गडकरी भारतीय जनता पार्टी 657624 2597 660221 55.67
3 मोहम्मद जमाल बहुजन समाज पार्टी 31654 71 31725 2.67
4 अली अशफाक अहमद बहुजन मुक्ति पार्टी 719 5 724 0.06
5 असीम अली माइनोरिटीज डेमोक्रेटिक पार्टी 672 1 673 0.06
6 गोपालकुमार गनेशु कश्यप छत्‍तीसगढ़ स्‍वाभिमान मंच 1169 0 1169 0.1
7 दिक्षीता आनंद टेंभुर्णे देश जनहित पार्टी 273 0 273 0.02
8 डॉ. मनीषा बांगर पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटिक) 397 3 400 0.03
9 मनोहर उर्फ सागर पुंडलीकराव डबरासे वंचित बहुजन अघाडी 25993 135 26128 2.2
10 ॲड. (डॉ.) माने सुरेश बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी 3387 25 3412 0.29
11 कॉम्रेड योगेश कृष्णराव ठाकरे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट) रेड स्टार 281 0 281 0.02
12 वनिता जितेंद्र राऊत अखिल भारतीय मानवता पक्ष 480 0 480 0.04
13 अ‍ॅड. विजया दिलीप बागडे अम्‍बेडकराइट पार्टी ऑफ इंडिया 1178 4 1182 0.1
14 विठ्ठल नानाजी गायकवाड हम भारतीय पार्टी 482 0 482 0.04
15 डॉ. विनोद काशीराम बडोले अखिल भारतीय सर्वधर्म समाज पार्टी 734 1 735 0.06
16 साहिल बालचंद तुरकर भारतीय मानवाधिकार फेडरल पार्टी 2003 0 2003 0.17
17 श्रीधर नारायण साळवे राष्ट्रीय जनसंभावना पार्टी 2121 0 2121 0.18
18 उदय रामभाऊजी बोरकर निर्दलीय 1321 1 1322 0.11
19 अ‍ॅड. उल्हास शालिकराम दुपारे निर्दलीय 299 0 299 0.03
20 कार्तिक गेंदलाल डोके निर्दलीय 181 0 181 0.02
21 दिपक लक्ष्मणराव मस्के निर्दलीय 233 2 235 0.02
22 प्रफुल्ल माणिकचंद भांगे निर्दलीय 358 1 359 0.03
23 प्रभाकर कृष्णाजी सातपैसे निर्दलीय 156 0 156 0.01
24 मनोज कोठुजी बावणे निर्दलीय 331 0 331 0.03
25 रुबेन डॉमनीक फ्रांसीस निर्दलीय 608 0 608 0.05
26 सचिन जागोराव पाटील निर्दलीय 632 1 633 0.05
27 सचिन हरीदास सोमकुंवर निर्दलीय 227 0 227 0.02
28 सतिश विठ्ठल निखार निर्दलीय 235 2 237 0.02
29 सिद्धार्थ आसाराम कुर्वे निर्दलीय 247 0 247 0.02
30 सुनिल सुर्यभान कवाडे निर्दलीय 417 0 417 0.04
31 NOTA इनमें से कोई नहीं 4538 40 4578 0.39
Total 1181715 4336 1186051