नवनीत राणा यांचा ऐतिहासिक विजय

0
48

अमरावती,दि.24: लोकसभा मतदारसंघात माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री तथा शिवसेनेकडून चारवेळा खासदार असलेल्या आनंदराव अडसूळ यांचा पराभव काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवार व युवा स्वाभिमानी पक्षाच्या नेत्या नवनीत कौर राणा यांनी करीत एैतिहासिक विजय मिळविला आहे.काँग्रेस, राष्ट्रवादी, रिपाइं (गवई गट) हे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले.तसे प्रकाश आंबेडकर यांचा आशीर्वाद मिळाल्यामुळेच हा विजय मिळविता आला.यात युवा स्वाभीमान पार्टीचे गावखेड्यात असलेले जाळे,कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच आघाडीचे सर्व प्रमुख नेते व कार्यकर्ते यांनी रात्रदिवंस घेतलेल्या परिश्रमामुळेच हा विजय मिळाल्याची प्रतिक्रिया नवनिर्वाचित खासदार नवनित रवी राणा यांनी दिली आहे.
अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या अमरावती लोकसभा मतदार संघातून विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ यांच्या विरोधात नवनीत कौर राणा यांना उमेदवारी देण्यात आली. निवडणूक निकालांचे कल हाती आल्यानंतर नवनीत राणा 36 हजार 951 मतांनी आघाडी घेत विज मिळविला आहे. नवनीत राणा यांना 5 लाख 10 हजार 947 तर आनंदराव अडसूळ यांना4 लाख 73 हजार 996 मते  मिळाली आहेत. २०१४ मध्ये नवनीत राणा यांनी आनंदराव अडसुळांना चांगलीच टक्कर दिली होती. मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.

 

महाराष्ट-अमरावती
परिणाम
क्रम संख्या अभ्यर्थी दल का नाम ई.वी.एम. मत डाक द्वारा मत कुल मत % मत
1 अडसूळ आनंदराव विठोबा शिवसेना 470549 3447 473996 42.61
2 अरूण मोतीरामजी वानखडे बहुजन समाज पार्टी 12232 104 12336 1.11
3 आठवले संजय हिरामणजी बहुजन महा पार्टी 1505 17 1522 0.14
4 गाडे विनोद मिलींद अम्बेदकरिस्ट रिपब्लिकन पार्टी 1198 13 1211 0.11
5 गुणवंत देवपारे वंचित बहुजन अघाडी 64585 550 65135 5.86
6 नरेंद्र बाबुलाल कठाणे राष्ट्रीय जनसुराज्य पार्टी 1644 10 1654 0.15
7 निलीमा नितीन भटकर पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटिक) 979 12 991 0.09
8 निलेश आनंदराव पाटील अम्‍बेडकराइट पार्टी ऑफ इंडिया 1224 5 1229 0.11
9 पंचशिला विजय मोहोड बहुजन मुक्ति पार्टी 1488 11 1499 0.13
10 अनिल नामदेवराव जामनेकर निर्दलीय 1079 9 1088 0.1
11 अंबादास शामराव वानखडे निर्दलीय 4750 4 4754 0.43
12 नवनित रवि राणा निर्दलीय 507844 3103 510947 45.93
13 पंकज लिलाधर मेश्राम निर्दलीय 2354 1 2355 0.21
14 प्रमोद लक्ष्मण मेश्राम निर्दलीय 1086 4 1090 0.1
15 प्रविण महादेव सरोदे निर्दलीय 1731 5 1736 0.16
16 मिनाक्षी सोमेश्‍वर कुरवाडे निर्दलीय 6600 2 6602 0.59
17 राजु बक्षी जामनेकर निर्दलीय 3555 1 3556 0.32
18 राजु महादेवराव सोनोने निर्दलीय 899 2 901 0.08
19 राजू शामरावजी मानकर निर्दलीय 489 0 489 0.04
20 राहुलभाऊ लक्ष्‍मणराव मोहोड निर्दलीय 774 0 774 0.07
21 विजय यशवंत विल्‍हेकर निर्दलीय 10550 15 10565 0.95
22 विलास शेषराव थोरात निर्दलीय 950 0 950 0.09
23 श्रीकांत उल्‍हासराव रायबोले निर्दलीय 1007 0 1007 0.09
24 ज्ञानेश्‍वर काशीराव मानकर निर्दलीय 675 1 676 0.06
25 NOTA इनमें से कोई नहीं 5200 122 5322 0.48
Total 1104947 7438 1112385