मुख्य बातम्या:

१५ वर्षांनंतर चंद्रपूरात काँग्रेसने रोवला झेंडा

चंद्रपूर,दि.24 :चंद्रपूर लोकसभा निर्वाचन क्षेत्राच्या निवडणुकीचा निकाल आता हाती आला असून आतापर्यंत भाजपचा गड असलेल्या या क्षेत्रात बाळू धानोरकर यांच्या रुपाने काँग्रेसने आपला झेंडा रोवला आहे. १५ वर्षांनंतर काँग्रेसने ही जागा मिळविली आहे. लोकसभेच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाच्या मतमोजणीत भाजपचे हंसराज अहीर यांना 5 लाख 14 हजार 744 मते मिळाली आहेत तर काँग्रेसचे सुरेश धानोरकर यांना5 लाख 59 हजार 507 मते पडली आहे. वंचितचे राजेंद्र महाडोळे यांना 1 लाख 12 हजार 079 मतांवर समाधान मानावे लागले आहे. सुरेश धानोरकर यांनी 55 हजार मतांनी अहिर यांचा पराभव केला.

धानोरकरांना उमेदवारी मिळावी यासाठी आमदार व विरोधीगटनेते विजय वड्डेटीवार यांनी आग्रह धरला होता.त्यांनी आपला आग्रह विजयाच्या रुपात पक्षासमोर खरा ठरविला आहे.
काँग्रेसश्रेष्ठी उमेदवाराबाबत ठाम नसल्यामुळे मतदार संभ्रमात पडले होते. चर्चेत नसताना अचानक विशाल मुत्तेमवार यांचे नाव पुढे आले. या नावारून जिल्ह्यातील गटबाजी उफाळून आली. आशिष देशमुख, विनायक बांगडे यांची नावे चर्चेत होतीच. मुत्तेमवार यांचे नाव मागे पडून अचानक निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून विनायक बांगडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाली. बांगडे यांच्या गोटात आनंदाचे वातावरण पसरले होते. मात्र ते अल्पकाळाचे ठरले. विशाल मु्त्तेमवारांसारखाच बांगडे यांच्या नावालाही कडवा विरोध झाला. अखेर सुरूवातीपासून काँग्रेसच्या तिकीटावर डोळा ठेवून असलेले सुरेश धानोरकर यांच्या नावावर पक्षाने शिक्कामोर्तब करीत बांगडे यांचे नाव यादीतून वगळले. यामुळे बांगडे यांच्याशी जुळलेला एक मोठा गट नाराजीचा सूर काढत राहिला. अखेरच्या क्षणापर्यंत ही नाराजी कायम होती. प्रचारातही एक गट कायम अंतर ठेवून होता त्या परिस्थितीत धानोरकरांनी वड्डेटीवारांच्या नेतृत्वात हा गड जिंकल्याने माजी खासदार नरेश पुगलियांच्या राजकारणाला खिळ बसणार आहे.

सलग तीनवेळा खासदार म्हणून निवडून गेलेले हंसराज अहिर हे केंद्रात गृहराज्यमंत्री असतानाही त्यांना पराभव स्विकारावा लागला.राज्यातील मातब्बर मंत्री सुधीर मुनगंटीवार या जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांना आपल्याच जिल्ह्यातील खासदाराला निवडून आणण्यात अपयश का आले यावरही खलबत्ते सुरु झाले आहेत.विशेष म्हणजे हायटेक विधानसभा मतदारसंघ बनविण्यासाठी कोट्यावधीचा निधी खर्च करण्यात आलेल्या बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातच बाळू धानोरकरांना 32 हजाराचे मताधिक्य आहे आणि हा मतदारसंघ राज्याचे अर्थमंत्री व जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचा आहे.

मतमोजणीच्या दहाव्या फेरीनंतर भाजपच्या गोटात चिंतेची लाट पसरली होती. कार्यकर्त्यांमध्ये व भाजप समर्थकांमध्ये नैराश्याचे वातावरण पसरू लागले. मतमोजणी केंद्राच्या परिसरात विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांची गर्दी कमी होऊ लागली. शहरातील चौकाचौकात सोशल मीडिया व टिव्हीवर निकालाची अपडेट घेणाºया काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तर विजयाचाच जल्लोष दिसून येत होता. दहाव्या फेरीनंतर काँग्रेसचे उमेदवार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांना २५८२७० मते तर भाजपाचे उमेदवार हंसराज अहीर यांना २३३७३८ मते मिळाली. म्हणजेच काँग्रेसचे धानोरकर हे सलग दहाव्या फेरीनंतरही आघाडीवर चालले होते. दहाव्या फेरीत तर त्यांनी २४ हजार ५३२ मतांची आघाडी घेतली. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच उत्साह संचारल्याचे दिसून आले.

महाराष्ट-चन्द्रपुर
परिणाम
क्रम संख्या अभ्यर्थी दल का नाम ई.वी.एम. मत डाक द्वारा मत कुल मत % मत
1 अहीर हंसराज गंगाराम भारतीय जनता पार्टी 512728 2016 514744 41.56
2 बाळुभाऊ उर्फ सुरेश नारायण धानोरकर इंडियन नेशनल कांग्रेस 557550 1957 559507 45.18
3 सुशील सेगोजी वासनिक बहुजन समाज पार्टी 11770 40 11810 0.95
4 डॉ. गौतम गणपत नगराळे बहुजन मुक्ति पार्टी 2432 18 2450 0.2
5 नितेश आनंदराव डोंगरे अम्‍बेडकराइट पार्टी ऑफ इंडिया 4694 7 4701 0.38
6 मडावी दशरथ पांडूरंग बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी 3075 28 3103 0.25
7 मधुकर विठ्ठल निस्ताने प्राउटिस्ट ब्लाक, इंडिया 1589 0 1589 0.13
8 अ‍ॅड. राजेंद्र श्रीरामजी महाडोळे वंचित बहुजन अघाडी 111547 532 112079 9.05
9 शेडमाके नामदेव मानीकराव गोंडवाना गणतंत्र पार्टी 3057 14 3071 0.25
10 अरविंद नानाजी राऊत निर्दलीय 1473 0 1473 0.12
11 नामदेव केशव किनाके निर्दलीय 5632 7 5639 0.46
12 मिलींद प्रल्हाद दहिवले निर्दलीय 2424 2 2426 0.2
13 राजेंद्र कृष्णराव हजारे निर्दलीय 4504 1 4505 0.36
14 NOTA इनमें से कोई नहीं 11311 66 11377 0.92
Total 1233786 4688 1238474
Share