मुख्य बातम्या:
ईव्हीएममुळे लोकशाही धोक्यात# #मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर, वाचा कुणाला मिळाले कोणते खात# #विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून २८ विधेयके मांडणार# #ट्रक-कारच्या धडकेत चार शिक्षक जखमी;बदली आदेश घेऊन जाताना अपघात# #रापम अधिकाऱ्यांच्या बचावासाठी तक्रारी गहाळ केल्या -नरेश जैन# #संघटनेशिवाय सामाजिक लढा अशक्य:- मनोहर चंद्रिकापुरे# #ग्राम विकास मंत्रालय व जिल्हा परिषद गोंदिया ने केली शिक्षकांची दिशाभूल# #मुख्याधिकाऱ्यास मारहाणप्रकरणी दोन माजी नगरसेवकांना ५ वर्षांचा सश्रम कारावास# #विजय वड्डेटीवर विधानसभेचे नवे विरोधी पक्षनेते, विरोधकांत एकमत# #मंत्रिमंडळ विस्ताराला सुरुवात; पहिल्या शपथेचा मान आयात नेत्यांना

निशुल्क एकदिवसीय उद्योजकता परिचय कार्यक्रम

गडचिरोली,दि. २४:- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था ( इअठढख ) पुणे पुरस्कृत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (चउएऊ)गडचिरोली द्वारा आयोजित अनूसूचित जाती प्रवर्गाकरीता एक दिवसीय उद्योजकता परिचय कार्यक्रम दिनांक २७ मे २०१९ रोजी सकाळी ११.०० वा. आदिवासी वस्तीगृह , मनोरंजन हॉल पोटेगाव रोड, गडचिरोली येथे आयोजीत करण्यात आलेले आहे.
कार्यक्रमात उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, उद्योग कसा उभारावा, उद्योग कसा निवडावा, यशस्वी उद्योजकाचे अनुभव कथन , विविध कार्यालय व महामंडळाचे कर्ज विषयक योजना, जिल्हा उद्योग केंद्राचे कर्ज विषयक योजना तसेच , शासनाचे विविध योजना व निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम करीता नाव नोंदणी करण्यात येणार आहे. करीता जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, अधिक माहिती साठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र गडचिरोली उ/० डोलीकर यांचे घरी नगर परिषद जवळ, धानोरा रोड, येथे संपर्क साधावा , असे आव्हान संदिप जाने , प्रकल्प अधिकारी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र गडचिरोली यांनी केले आहे.

Share