मुख्य बातम्या:
ईव्हीएममुळे लोकशाही धोक्यात# #मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर, वाचा कुणाला मिळाले कोणते खात# #विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून २८ विधेयके मांडणार# #ट्रक-कारच्या धडकेत चार शिक्षक जखमी;बदली आदेश घेऊन जाताना अपघात# #रापम अधिकाऱ्यांच्या बचावासाठी तक्रारी गहाळ केल्या -नरेश जैन# #संघटनेशिवाय सामाजिक लढा अशक्य:- मनोहर चंद्रिकापुरे# #ग्राम विकास मंत्रालय व जिल्हा परिषद गोंदिया ने केली शिक्षकांची दिशाभूल# #मुख्याधिकाऱ्यास मारहाणप्रकरणी दोन माजी नगरसेवकांना ५ वर्षांचा सश्रम कारावास# #विजय वड्डेटीवर विधानसभेचे नवे विरोधी पक्षनेते, विरोधकांत एकमत# #मंत्रिमंडळ विस्ताराला सुरुवात; पहिल्या शपथेचा मान आयात नेत्यांना

मेंढे यांच्या मूळगावासह मतदारसंघात कार्यकर्त्यांनी साजरी केली दिवाळी

गोंदिया,दि.24 : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातून मताधिक्क्याने निवडून आलेल्या सुनील मेंढे यांच्या मूळगावी ग्रामस्थांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. ग्रामस्थांनी जणू दिवाळीच साजरी केली, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.मेंढे यांचे मुळ गाव पवनी तालुक्यातील आसगाव हे आहे.बालवयापासूनच त्यांच्या मनावर राष्ट्रीय स्वयसेवंक संघाचे विचार रुजलेले आहेत.
जिल्ह्याच्या राजकारणात अडीच वर्षांपुर्वी पाय ठेवलेल्या सुनील मेंढे यांच्या कार्यकिर्दला भंडाराचे नगराध्यक्ष म्हणून सुरूवात झाली. अल्पावधीतच बरीच कामे त्यांनी भंडारा शहरात खेचून आणली. मेंढे हे पवनी तालुक्यातील आसगाव येथील मूळ रहिवासी होत. आजही त्यांचे तिथे घर असून सतत जाणे-येणे असते. जिल्हा पातळी ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणांशी त्यांची नाळ जुळली गेली असली तरी त्यांचे आसगाव या जन्मगावचे प्रेम अबाधित आहे.आज तुमसर,गोंदिया,तिरोडा,साकोली,अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात त्यांची विजयीमिरवणूक काढम्यात आली.तिरोडा येथे आमदार विजय रहागंडाले यांच्या नेतृत्वात त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी नगराध्यक्ष,आमदार फुके,,बाजार समितीचे सभापती,नगरपरिषदेचे पदाधिकारी मोठ्या संख्यने उपस्थित होते.जिल्हाध्यक्ष  हेमंत पटले,पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्यासह गोंदियात विनोद अग्रवाल,सुनिल केलनका,कमलेश सोनवाने, आदीनी त्यांच्या मिरवणुकीत सहभाग घेतला.गोंदियातील गांधी प्रतिमेजवळ सुरत येथे झालेल्या अग्नीकांडातील शहिदांना यावेळी नवनिर्वाचीत खासदारासह सर्वांनी श्रध्दांजली वाहिली.
भंडाराच्या नगराध्यक्ष पदावर निवडून आल्यानंतर जिल्ह्याच्या राजकारणात सक्रीय असताना भाजपने त्यांना खासदार पदाची निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारी घोषीत केली. अशातच निकाल लागल्यावर गुरूवारी गावात एकच जल्लोष करण्यात आला. जवळपास दोन लाखांच्या घरात मते अधिक घेवून निवडून आल्याने विजयाचा आनंद द्विगुणीत झाला.
क्षणाक्षणाने मतमोजणी केंद्रातून तथा आॅनलाईनवर उपलब्ध माहितीच्या आाधारे लढतीचे चित्र स्पष्ट होत गेले. उल्लेखनीय म्हणजे पहिल्या फेरीपासूनच भाजपचे उमेदवार सुनील मेंढे यांना मताधिक्य मिळत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह अजूनच वाढतच होता. परिणामी गावात व बाहेर सदस्य, कार्यकर्ता पदाधिकारी यांच्यासह विविध सेलचे पदाधिकारी यांनीही यावेळी उपस्थिती दर्शवित विजयाचा आनंद द्विगुणीत केला.
सायंकाळच्या सुमारास आसगाव येथे भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, सदस्यगण व ग्रामस्थांनी एकत्र येवून मेंढे यांच्या विजयाबद्दल एकमेकांना पेढे वाटून शुभेच्छा दिल्या. ढोल-ताशांचा गजर करीत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. विशेष म्हणजे भंडारा-गोंदिया जिल्ह्यातच भाजपच्या दणदणीत विजयानंतर एकच जल्लोष करण्यात आला. भंडारा शहरातून सायंकाळच्या सुमारास सुनील मेंढे यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली.आज दिवसभर मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यात त्यांचे स्वागत व मिरवणुक काढण्यात आली.

Share