अनुराधा गुंडेवार यांचा राज्यस्तरीय महिला समाजरत्न पुरस्काराने सन्मान

0
18

नांदेड,दि.25ःः यशवंती प्रेरणादायी सामाजिक संस्था, पुणेद्वारा आयोजित एका विशेष कार्यक्रमात राज्यस्तरीय महिला समाजरत्न पुरस्काराने नांदेड जिल्ह्यातील श्री महर्षी मार्केंडेश्वर प्रतिष्ठान उमरी च्या अध्यक्षा श्रीमती अनुराधा गुंडेवार यांना 2018 च्या मिस इंडिया शुभांगिनी सांगळे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पुणे येथील जेष्ठ वास्तू विशारद डॉ.श्रीकांत धुमाळ होते.प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ कृषितज्ञ रश्मीकुमार अब्रॉल,माजी सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील खळदकर उपस्थित होते. या सन्मान सोहळ्याचे मुख्य संयोजक राजेश बाबासाहेब दिवटे हे होते.श्रीमती गुंडेवार यांना पुरस्कार मिळाल्याबद्ल श्रीमंत राजेंद्र सगर (संस्थापक काव्य मित्र संस्था महाराष्ट्र),प्रवीण भाकरे (संस्थापक नवरत्न प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य),मारुती गुंडेवार,सीमा अ. राऊत पाटील, सौ.पंचवटी संभाजी गोंडाळे, सौ.पूनम केंद्रे,सौ.सुजाता जाधव,सौ.उषा नळगीरे तसेच इतर मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.