मुख्य बातम्या:
ईव्हीएममुळे लोकशाही धोक्यात# #मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर, वाचा कुणाला मिळाले कोणते खात# #विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून २८ विधेयके मांडणार# #ट्रक-कारच्या धडकेत चार शिक्षक जखमी;बदली आदेश घेऊन जाताना अपघात# #रापम अधिकाऱ्यांच्या बचावासाठी तक्रारी गहाळ केल्या -नरेश जैन# #संघटनेशिवाय सामाजिक लढा अशक्य:- मनोहर चंद्रिकापुरे# #ग्राम विकास मंत्रालय व जिल्हा परिषद गोंदिया ने केली शिक्षकांची दिशाभूल# #मुख्याधिकाऱ्यास मारहाणप्रकरणी दोन माजी नगरसेवकांना ५ वर्षांचा सश्रम कारावास# #विजय वड्डेटीवर विधानसभेचे नवे विरोधी पक्षनेते, विरोधकांत एकमत# #मंत्रिमंडळ विस्ताराला सुरुवात; पहिल्या शपथेचा मान आयात नेत्यांना

अभिनेता अजय देवगणचे वडील अ‍ॅक्शन डायरेक्टर वीरू देवगण यांचे निधन

मुंबई,दि.27ः- बॉलिवूडमध्ये अ‍ॅक्शन डायरेक्टर, दिग्दर्शक, निर्माते म्हणून एक वेगळी ओळख निर्माण केलेले अभिनेता अजय देवणग यांचे वडील विरु देवगण यांचे आज सकाळी निधन झाले असून विलेपार्ले येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जाणार आहेत. वीरू देवगण यांना हृदयविकाराचा झटका आल्याने सांताक्रूजमधील सूर्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.वीरू देवगण गेल्या कित्येक दिवसांपासून आजारी होते आणि त्याचमुळे अजयने दे दे प्यार दे या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या प्रमोशनच्यावेळी काही मुलाखती रद्द केल्या होत्या.

वीरु देगगण यांनी ८० हून जास्त चित्रपटांमध्ये अ‍ॅक्शन डायरेक्टर म्हणून काम केले. वीरू यांनी लाल बादशहा, इश्क, क्रांती, जान, हकीगत यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये अ‍ॅक्शन डायरेक्ट म्हणून काम केले आहे. वीरु यांनी क्रांती, सौरभ, सिंहासन यांसारख्या चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. त्यांनी हिंदुस्थान की कसम या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यासोबतच या चित्रपटाची निर्मिती केली होती. तसेच दिल क्या करे या चित्रपटाचे निर्माते देखील तेच होते. वीरु देवगण यांच्या पश्चात चार मुले असून अभिनेता अजय देगगण हा त्यांचा मुलगा आहे. अभिनेत्री काजोल ही त्यांची सून असून अजय आणि काजोलसोबत अनेकवेळा सार्वजनिक कार्यक्रमात ते हजेरी लावत.

Share