देसाईगंज येथे विद्युत तारांच्या स्पर्शाने कापसाचा ट्रॅक खाक

0
18

देसाईगंज-स्थानिक गादी व्यापारी जावेद हुसैनी यांचा अमरावती वरून देसाईगंज येथे कापूस घेऊन येणारा ट्रक विजेच्या जीवंत तारांना झाल्याने जळूऩ खाक झाल्याची घटना आज (दि.31) दुपारी तीनच्या सुमारास घडली. यामध्ये हुसैनी यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

ट्रक क्र. एमएच 40एके 6655 हा ट्रक अमरावती वरून हुसैनी यांचा कापून घेऊन वडसा येथे येत होता. स्थानिक बाबुराव मडावी महाविद्यालयाजवळ हा ट्रक पोचताच त्याचा रस्त्यावरून जाणाऱ्या विजेच्या तारांना स्पर्श झाल्याने ट्रकने पेट घेतला. यावेळी देसाईगंज येथील आणि ब्रम्हपुरी येथील अग्निशमन दलाला पाचारण करून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.