महिला व्यवसाय कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत महिला जागृति मेळावा

0
23

गोरेगाव:- महिला व्यवसाय कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत महिला जागृति मेळाव्याचे आयोजन रविवार दिनांक 02 जुन 2019 गोरेगाव तालुका अंतर्गत येणा-या ग्राम कवडीटोला (गिधाडी) स्थित जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा येथे सायंकाळी 4 वाजता ग्रामपंचायत गिधाडी तर्फे करण्यात आले आहे.

सदर प्रशिक्षण कार्यक्रमाला प्रशिक्षक म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) गोंदिया जिल्ह्याचे प्रकल्प अधिकारी हृदय गोडबोले, प्रमुख पाहुणे मार्गदर्शक म्हणून सामाजिक कार्यकर्ते प्रा.सविताताई बेदरकर, महेंद्र कठाणे, अतुल सतदेवे, निलेश भुते (प्रकल्प अधिकारी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र गोंदिया जिल्हा), शारदा कलस्कर (समतादूत, सामाजिक न्याय विभाग), धनराज बनकर (सामाजिक विकास व नागरी सुविधा व्यवस्थापक न.प. गोंदिया), गोरेगाव पंचायत समिति सभापती माधुरीताई टेंभरे, उपसभापती लीनाताई बोपचे, पोलिस पाटिल पूनमताई जयतवार, मुख्याध्यापीका एल. आय.बिसेन उपस्थित राहणार आहेत. 
नवीन उद्योजकांसाठी पूरक वातावरण निर्माण करण्याचा उद्देश्याने तसेच शासनातर्फे सुरु असलेल्या विविध योजने अंतर्गत स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याचे प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित सदर कार्यक्रमाला अधिकाधिक संख्येने उपस्थितिचे आवाहन स्थानिक ग्रामपंचायत सदस्य, महिला बचत गट समूह, आंगणवाड़ी सेविका, आशा सेविका, व समस्त महिला मंडळ ग्राम कवडीटोला कडुन करण्यात आले आहे.