मनोहर चंद्रिकापुरे यांची प्रेरणा पुरस्कारासाठी निवड

0
42

नवेगावबांध- महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरिय प्रेरणा पुरस्कारासाठी गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा किसान आघाडी प्रमुख मनोहर चंद्रिकापुरे आणि बोंडे नवेगाव येथील अशोक हांडेकर यांची निवड करण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यातील वेल्हे येथे 2 जून रोजी हा पुरस्कार महाराष्ट्र पत्रकार संघाच्या  16व्या राज्यस्थरीय अधिवेशनात देण्यात येणार आहे. या अधिवेशनाला जिल्ह्यातील पत्रकारांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन  संघाचे गोंदिया जिल्हाध्यक्ष सतिश कोसरकर यांनी केले आहे.