पावसाळ्यात आपत्ती घडू नये यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे- देवेंद्र फडणवीस

0
13

मुख्यमंत्र्यांनी घेतला मान्सूनपूर्व तयारीचा आढावा

मुंबईदि. 1 : पावसाळ्यात पूरइमारत पडणेपाणी साचणे अशा घटना घडू नयेतयासाठी संबंधित यंत्रणांनी योग्य ते नियोजन करावे. तसेच आपत्कालीन नियंत्रण कक्षात मनुष्यबळाने सतर्क राहून सर्व संपर्क क्रमांक सुरू असतीलयाची दक्षता घ्यावीअसे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.

सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या राज्यस्तरीय मान्सूनपूर्व तयारीच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत (दादा) पाटीलमुख्य सचिव अजोय मेहता यांच्यासह विविध विभागाचे सचिवतीनही सैन्य दलाचे अधिकारीतटरक्षक दलाचे अधिकारीराष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलसर्व विभागीय आयुक्तविविध महानगरपालिकांचे आयुक्त तसेच केंद्र व राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेपावसाळ्यातील तयारीसंदर्भात सर्व यंत्रणांनी चांगली तयारी केली आहे. या काळात पुनर्वसन व योग्य तयारी केल्यास संभाव्य आपत्ती टाळू शकतो. मागील काही वर्षात सर्व यंत्रणांनी पावसाळ्यात चांगल्या प्रकारे काम केले आहे. त्या अनुभवावरून पुढील काळात आणखी चांगले काम करता येईल. मात्रत्यावरच अवलंबून न राहतासंस्थागत ज्ञान,अनुभव व दूरदृष्टी ठेवून योग्य तयारी केल्यास आपत्ती टाळता येईल.

या काळात मुंबई बरोबरच नागपूरनाशिकपुणे आदी शहरांमधील पूर परिस्थितीधोकादायक इमारती आदींवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. शहरांमध्ये पावसाचे पाणी साचू नयेतसेच पावसामुळे वाहतूक कोंडी होऊ नयेयासाठी कमांड व कंट्रोल रुमच्या माध्यमातून सीसीटीव्हीद्वारे लक्ष ठेवण्यात यावे. मुंबईमधील धोकादायक व नादुरुस्त रेल्वे पूलइमारती याबद्दल महानगरपालिका व रेल्वे विभागाने समन्वयाने निर्णय घ्यावाअसेही त्यांनी सांगितले.

आपत्ती निवारण दलाच्या पथकाने सतर्क रहावे. तसेच आपत्ती काळात वापरण्यात येणारी यंत्रेसाधने ही सुस्थितीत असतील याची काळजी घ्यावी. तसेच आपत्ती घडल्यानंतर त्या ठिकाणी कमीत कमी वेळेत मदत पोहचावी यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी. आपत्ती प्रतिसाद केंद्रातील संपर्क यंत्रणा चोवीस तास सतर्क राहतील व त्या ठिकाणी कर्मचारी उपस्थित असतील याची दक्षता घ्यावीअसे निर्देशही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली.

मदत व पुनर्वसन मंत्री श्री. पाटील म्हणालेराज्यातील विविध विभागानी पावसाळ्यात घडणाऱ्या आपत्ती निवारणासाठी मोठ्या प्रमाणात तयारी केली आहे. तसेच या तयारीची माहितीही नागरिकांपर्यंत पोहचवावी. या काळात यंत्रणांनी सतर्क रहावे. मंत्रालयातील नियंत्रण कक्षही अद्ययावत करावा.

मदत व पुनर्वसन सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी राज्य शासनाच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या आपत्त्कालीन नियंत्रण कक्षाची माहिती दिली. भारतीय हवामान खात्याचे के. एस. होसळीकर यांनी राज्यातील मोसमी पावसाचा अंदाजाची माहिती दिली. राज्यात 17 जूनपर्यंत सर्वत्र पावसाची उपस्थिती जाणवणार आहे. तसेच राज्यात यंदा सरासरी 96 ते 104 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

राज्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) 18 व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे (एसडीआरएफ) 3 पथके सदैव तैनात असणार आहेत. त्यापैकी एनडीआरएफची तीन फिरती पथके ही कोणत्याही क्षणी मदतीसाठी तयार ठेवण्यात आली असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सैन्य दलाच्या वतीनेही आपत्ती निवारण दले सज्ज ठेवण्यात आली असून गरज पडल्यास हेलिकॉप्टरही उपयोगात आणण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. रेल्वेहवामान खातेविविध विभागीय आयुक्तकोस्टगार्डतीनही सैन्य दले यांनीही मान्सूनपूर्व तयारीचे सादरीकरण केले.