दिशा निरीक्षण गृहातील मुलींचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान

0
17

वाशिम, दि. ०१ : महिला व बालविकास विभागांतर्गत अनाथ, निराधार, निराश्रित मुला-मुलींच्या पुनर्वसनासाठी बालगृह, निरीक्षणगृह, अनुरक्षणगृह व दत्तकसंस्था चालविण्यात येतात. जिल्ह्यातील दिशा निरीक्षणगृहातील ३ विद्यार्थींनी यंदा इयत्ता बारावीच्या परीक्षेत प्राविण्यासह उत्तीर्ण झाल्या. या विद्यार्थिनींचा सत्कार आज जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी तिन्ही विद्यार्थिनींना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुभाष राठोड, दिशा मुलींचे निरीक्षणगृहाचे अधीक्षक आलोक अग्रहारी, विधी सल्लागार वर्षा पराते, शिक्षक गोपाल मोरे आदी उपस्थित होते.

दिशा निरीक्षणगृहात प्रवेशित असलेल्या वैष्णवी विठ्ठल कुकडे हिला बारावी परीक्षेत ७८ टक्के गुण, पूजा तेजराव अढाव हिला ७२ टक्के व साक्षी सतीश अवचार हिला ५८ टक्के गुण मिळाले आहेत.