संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात मेहताखेडा विभागात प्रथम

0
48

पाण्याच्या एटीएमला  दिले पुलवामा शहिदांची नावे

देवरी,दि.2- तालुक्यातील दुर्गम भागातील मेहताखेडा हे गाव यावर्षीच्या संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानामध्ये नागपूर विभागातून तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले आहे. या गावाला जिल्ह्यातून पाच लाख आणि विभागातून सहा लाखाची पुरस्कार राशी मिळाली आहे. दरम्यान, गावात स्थापित पाण्याच्या एटीएम ला पुलवामा स्फोटात शहिद झालेल्या  नितीन राठोड आणि संजयसिंग दिक्षित यांनी नावे देण्यात आली आहेत.

देवरी तालुक्यातील मेहताखेडा गाव हे अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात वसले असून या गावातील प्रत्येक घरांच्या भिंतींवर संताचे विचार लिहिलेले आढळून येतात. या गावातील सर्व मालमत्तांवर घरातील महिलांचे नाव दर्ज करण्यात आले असून स्त्री  सन्मानाला येथे प्राधान्य आहे. गावात सांडपाण्याची सोय व्हावी म्हणून मोठ्याप्रमाणावर शोषखड्डे सुद्धा तयार करण्यात आले आहेत. गावात पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय म्हणून वाटर एटीएम बसवून त्यांना पुलवामा स्फोटातील शहिदांची नावे देण्यात आली. गावकऱ्यांसाठी दरदिवशी ध्वनीक्षेपकांवरून सांयकाळी सहाच्या सुमारास स्वच्छता, प्रार्थना, सुविचार, दैनिक माहिती व तापमान आदी विषयावर माहिती प्रक्षेपित करण्यात येते. हे गाव पूर्णतः व्यशनमुक्त आहे.

या गावाला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी सरपंच महाराणी सलामे, उपसरपंच आसोबाई अरकरा, सदस्य सुरेश कुंजाम, मन्नू मडावी, माधुरी नरेटी, उषा मडावी,. कल्पना सर्पा, यमुना कुंजाम, रुपसिंग सर्पा, आणि गावकऱ्यांनी परिश्रम घेतले.