राज्यात दारूचा खप 22 टक्क्यांनी वाढला

0
14

मुंबई : एकीकडे राज्यात व्यशनमुक्तीसाठी प्रयत्न होत असतानाच राज्यात दारूचा खप कमी होण्याची चिन्हे दिसत नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत रााज्यात दारूच्या खपात चक्क 22 टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे.  भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याच्या विक्रीत 16 टक्के तर देशी दारूच्या विक्रीत 12 टक्के वाढ नोंदवली गेली असून  बीअरचा खप मात्र सव्वा आठ टक्क्यांनी वाढला आहे.

मागील वर्षी 61 लाख बल्क लीटर वाइनची विक्री झाली होती, तर यंदा 74 लाख बल्क लीटर विक्री झाली आहे. राज्यातील 6 विभागांमध्ये सर्वात जास्त वाढ कोल्हापूर विभागात 62टक्के झाली आहे. त्या खालोखाल नागपूर विभागात58 टक्के, औरंगाबाद विभागात 50 टक्के, नाशिक विभागात 29 टक्के, पुणे विभागात 28टक्के, ठाणे विभागात सर्वात कमी म्हणजे 13टक्के वाढ झाली आहे. ठाणे विभागात सर्वात कमी वाढ मुंबई शहर जिल्ह्यामध्ये 0.5 टक्के, तर मुंबई उपनगर जिल्ह्यात 7 टक्के वाढ झाली आहे. ठाणे जिल्ह्यात 23 टक्के, पालघर जिल्ह्यात 40 टक्के, तर ठाणे विभागात सर्वात अधिक रायगड जिल्ह्यात 43 टक्के झाली आहे.

देशी दारूच्या विक्रीत राज्यात १२.२ टक्के वाढ झालेली असून, पुणे विभागात विक्रीमध्ये सर्वात अधिक १८.८४ टक्के वाढ झाली आहे, तर सर्वात कमी वाढ ठाणे विभागात ६.१९ टक्के झाली आहे. 

देशी बनावटीच्या विदेशी मद्याच्या विक्रीमध्ये राज्यात १५.८९ टक्के वाढ झाली आहे. ठाणे विभागात सर्वात कमी १०.२७ टक्के वाढ झाली आहे, तर औरंगाबाद विभागात सर्वात अधिक २५.२५ टक्के वाढ झाली आहे.