मुख्य बातम्या:
कीटकनाशक प्राशन करून 2 शेतकर्यांच्या मृत्यू# #१0 वर्षांपासून अनुकंपाधारका नोकरीच्या प्रतीक्षेत,जि.प.अध्यक्षांना निवेदन# #ग्रामपंचायतमध्ये स्वीकृत सदस्य निवडण्याची गरज - बालू चुन्ने# #राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच बहुजनांचे हित जोपासणारी-चंद्रिकापुरे# #माजी पस सभापती छगनलाल पटले यांचे निधन# #हनुमंत अ‍ॅग्रो कंपनीची १.८५ कोेटींनी फसवणूक# #न्यू चैम्पियन कराटे क्लबच्या विद्यार्थीची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड# #एक शाम देश कें नाम हर्षोल्लास के साथ# #साक्षी पुरावे देऊनही देवरी पोलिसांची कारवाई शून्य# #महाजनादेश यात्रेत ओबीसी आरक्षण पुर्ववत करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा हवेतच विरली

6 जून पासून जिल्हास्तरीय स्वयंसिध्दा शिबीराचे आयोजन

 गोंदिया :  क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गोंदिया द्वारे जिल्ह्यातील 30 युवतींसाठी 6 जून पासून ते 15 जून 2019 या कालावधीत स्वयंसिध्दा अंतर्गत मास्टर ट्रेनर्स तयार करण्याकरीता दहा दिवसीय जिल्हास्तरीय निवासी शिबिराचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल, मरारटोली, गोंदिया येथे करण्यात आले आहे. महिलांनी स्वत:चे स्वरक्षण करण्याकरीता राज्य शासनाने स्वयंसिध्दा योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत त्यांना स्वरक्षणाच्या विविध बाबी, तंत्र, व्याख्यान, तज्ञ मार्गदर्शकांमार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

 तरी जिल्ह्यातील इच्छूक युवतींनी कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मरारटोली, गोंदिया येथे प्रत्यक्ष संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित करुन घ्यावा. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष गांगरेड्डीवार यांनी केले आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Share