14 जूनला केटीएस रुग्णालयात कर्करोग निदान शिबीर    

0
20

गोंदिया : भारतामध्ये कर्करुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रारंभिक लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यामुळे अनेकांना मृत्यूला सामोरे जावे लागते. वेळीच निदान झाल्यास कर्करोगापासून बचाव होवू शकतो. त्यासाठी केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया येथे 14 जून रोजी सकाळी 11 पासून ते दुपारी 2 पर्यंत कर्करोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचे आयोजन दंत विभाग (क्र.22) ओपीडी परिसरात तपासणी करण्यात येईल. या शिबिरामध्ये लघवी आणि शौचच्या वेळी रक्त जाणे, वारंवार रक्ताची कमतरता होणे, थकवा तसेच कमजोरी येणे, खोकलतांनी रक्त येणे, स्तन भागी गाठ, मासिक पाळीच्या वेळी अती रक्तस्त्राव, गिळतांनी त्रास, गळ्यात किंवा शरीराच्या इतर ठिकाणी गाठ तसेच तोंडात पांढरा चट्टा, लाल चट्टा, तोंडातील 15 दिवसापेक्षा जास्त असलेली व्रण (जखम), जिभेवर किंवा गालावरील गाठ इत्यादी लक्षणे आढळल्यास तपासणी करुन निदान करण्यात येईल. या शिबिरामध्ये दत्ता मेघे वैद्यकीय महाविद्यालय सावंगी (वर्धा) येथील कर्करोग तज्ञ चमू व केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयातील तज्ञ यावेळी सेवा देणार आहेत. तरी वरीलप्रमाणे लक्षणे आढळल्यास या शिबिराचा संबंधितांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य‍चिकित्सक डॉ.हिंमत मेश्राम यांनी केले आहे.

00000