पाणी टंचाई उपाययोजना  21 नविन विंधन विहिरींना मान्यता

0
17

  गोंदिया :  जिल्हाधिकारी गोंदिया यांनी टंचाई निवारणाच्या कामासाठी असलेल्या अधिकाराचा वापर करुन तिरोडा तालुक्यातील 7 गावे/वाड्यामध्ये, सडक/अर्जुनी तालुक्यातील 4 गावे/वाड्यामध्ये, गोंदिया तालुक्यातील 9 गावे/वाड्यामध्ये व आमगाव तालुक्यातील 1 गाव/वाड्यामध्ये, अशा एकूण 21 नविन विंधन विहिरींच्या कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे.

  तिरोडा तालुक्यातील बेलाटी येथे सुर्यप्रकाश चौधरी यांच्या घराजवळ, खोपडा येथे मंसाराम मरझडे यांच्या घराजवळ, नवेगाव खु. येथे शालीक इनवते यांच्या घराजवळ, चांदोरी बु. येथे जिल्हा परिषद शाळेजवळ, मुंडीकोटा येथे चतुरलाल पाथरे यांच्या घराजवळ, येडमाकोट येथे गजानन मडकाम यांच्या घराजवळ, घोघरा पाटीलटोला येथे वसंता शेंडे यांच्या घराजवळ. सडक/अर्जुनी तालुक्यातील पांढरी येथे जीवन नाईके यांच्या घराजवळ, चिचटोला येथे श्रीमती लिलाबाई येसनसुरे यांच्या घराजवळ, कोसमतोंडी येथे नाजुक उईके यांच्या घराजवळ, मुरपार राम येथे समेंद्र पटले यांच्या घराजवळ. गोंदिया तालुक्यातील गोंडीटोला (लोहारा) येथे ओमकार लिल्हारे यांच्या घराजवळ, वडेगाव येथे संतोष हिवरे यांच्या घराजवळ, पांढराबोडी येथे बुध्दराम बिहारी यांच्या घराजवळ, लोधीटोला (धापे.) येथे भूपसिंग बघेल यांच्या घराजवळ, पारडीबांध येथे काशिनाथ लिल्हारे यांच्या घराजवळ, चुलोद येथे लोकचंद ठाकुर यांच्या घराजवळ, कटंगटोला येथे श्रीमती जनकाबाई बाहे यांच्या घराजवळ, डोंगरगाव येथे दौलत मेश्राम यांच्या घराजवळ, धामनेवाडा येथे भैय्यालाल कोरे यांच्या घराजवळ. आमगाव तालुक्यातील सितेपार येथे कारु चौधरी यांच्या घराजवळ अशा एकूण 21 ठिकाणी 22 लक्ष 85 हजार 52 रुपयांमधून नविन विंधन विहिरी तयार करण्यात येणार आहे. असे जिल्हाधिकारी गोंदिया यांनी कळविले आहे.