मुख्य बातम्या:
ईव्हीएममुळे लोकशाही धोक्यात# #मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर, वाचा कुणाला मिळाले कोणते खात# #विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून २८ विधेयके मांडणार# #ट्रक-कारच्या धडकेत चार शिक्षक जखमी;बदली आदेश घेऊन जाताना अपघात# #रापम अधिकाऱ्यांच्या बचावासाठी तक्रारी गहाळ केल्या -नरेश जैन# #संघटनेशिवाय सामाजिक लढा अशक्य:- मनोहर चंद्रिकापुरे# #ग्राम विकास मंत्रालय व जिल्हा परिषद गोंदिया ने केली शिक्षकांची दिशाभूल# #मुख्याधिकाऱ्यास मारहाणप्रकरणी दोन माजी नगरसेवकांना ५ वर्षांचा सश्रम कारावास# #विजय वड्डेटीवर विधानसभेचे नवे विरोधी पक्षनेते, विरोधकांत एकमत# #मंत्रिमंडळ विस्ताराला सुरुवात; पहिल्या शपथेचा मान आयात नेत्यांना

महिला व्यवसाय कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत महिला जागृति मेळावा संपन्न

गोरेगाव:- महिला व्यवसाय कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत महिला जागृति मेळाव्याचे आयोजन गोरेगाव तालुका अंतर्गत येणा-या ग्राम कवडीटोला (गिधाडी) स्थित जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा येथे ग्रामपंचायत गिधाडी तर्फे करण्यात आले.

सदर कार्यक्रमाला प्रशिक्षक म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) गोंदिया जिल्ह्याचे प्रकल्प अधिकारी हृदय गोडबोले, प्रमुख पाहुणे मार्गदर्शक म्हणून सामाजिक कार्यकर्ते प्रा.सविताताई बेदरकर, संविधान मैत्री संघाचे महेंद्र कठाणे, पत्रकार अतुल सतदेवे, धनराज बनकर (सामाजिक विकास व नागरी सुविधा व्यवस्थापक न.प. गोंदिया), जनशिक्षण प्रकल्प अधिकारी विनायक डोंगरवार, सामंत राय, गोरेगाव पंचायत समिति सभापती माधुरीताई टेंभरे, उपसभापती लीनाताई बोपचे, पोलिस पाटिल पूनमताई जयतवार, सरपंच रेखाताई मेश्राम, उपसरपंच भूपेंद्र तिरेले, प्रामुख्याने उपस्थित राहुन कमी खर्चातुन छोटे छोटे उद्योग उभारणी कशा प्रकारे केली जाऊ शकते याची माहिती दिली.
नवीन उद्योजकांसाठी पूरक वातावरण निर्माण करण्याचा उद्देश्याने तसेच शासनातर्फे सुरु असलेल्या विविध योजने अंतर्गत स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याचे प्रोत्साहन व माहिती देण्यासाठी आयोजित सदर कार्यक्रमाला महिलांची अधिक उपस्थिति होती. कार्यक्रमाचे संचालन बबिताताई पारधी, प्रा. सचिन नांदगाये यानी प्रास्ताविक तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापीका एल .आय.बिसेन यानी केले। कार्यक्रम प्रारंभी मान्यवर अतिथींच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीमाई फुल्यांच्या तैलचित्रावर माल्यार्पण करुन दीप प्रज्वलन करण्यात आले तर जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाला येथिल विद्यार्थिनीनी स्वागत गीत प्रस्तूत केले. कार्यक्रम यशस्वी पार पड़ावे म्हणून डॉ.सागर पटले, मीनाक्षीताई येडे, भूमेश्वरीताई हरिनखेड़े, ग्रामसेवक एम. यू. खाड़े, सांवलराम ठाकरे, शांताबाई व-हाडे यांच्या सोबत स्थानिक ग्रामपंचायत सदस्य, महिला बचत गट समूह, आंगणवाड़ी सेविका, आशा सेविका, व समस्त महिला मंडळ यानी अथक प्रयास केले।

Share