मानवता धर्माची कृतीद्वारे पूजा हीच संस्कृती – उमेश कोठीकर

0
104

मदत फाउंडेशन पुणे द्वारा दर्यापूरात निराधारांना आधार

दर्यापूर(ता.प्र.) -सेवा करण्याचा विचार हा प्रत्यक्ष कृतीत उतरला तर खऱ्या अर्थाने मानवता धर्माची पूजा केली जाऊ शकते व हीच आमची संस्कृती असल्याचे भावपूर्ण प्रतिपादन मदत फाउंडेशन पुणे या समाजसेवी सं संस्थेचे सचिव उमेश कोठीकर यांनी केले.

दर्यापूर येथे या संस्थेने भेट दिली असता मूळ दर्यापूर शहराचे रहिवासी यांनी शिक्षण काळातील बालपणीच्या आपल्या आठवणींना उजाळा दिला.सध्या स्थितीत शासनाच्या उच्च पदावर कार्यरत असलेल्या उमेश कोठीकर यांनी महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या फेसबुकवर मित्र असलेल्या तरूण मुलामुलींना घेऊन सेवा हेच कर्म ,सेवा हाच धर्म या ब्रीदवाक्यावर आधारित मदत फाउंडेशन पुणे या संस्थेची स्थापना केली असून संपूर्ण महाराष्ट्रभर विविध सामाजिक उपक्रम ही संस्था राबवत आहे .याचाच भाग म्हणून दर्यापूर तालुक्यातील बेलोरा येथील अपंग विद्यार्थी सौरभ रघुनाथ भारसाकळे याला शिक्षणासाठी तीनचाकी सायकल, अपंग विद्यार्थिनी कु.महिमा हेमने हिला शिक्षणासाठी तीन हजार रुपयांची मदत ,तसेच थिलोरी येथिल आत्मह्त्याग्रस्थ शेतकरी कुटुंबातील छोटा मुलगा याला दोन हजार रुपयांची मदत,तसेच गाडगेबाबा निराधार बालआश्रम बनोसा यांना पाच हजार रुपयांची मदत दर्यापूर येथिल स्थानिक रामदेवबाबा मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात मदत फाउंडेशन पुणे यांनी उपसतीत मान्यवरांच्या हस्ते केली.या प्रसंगी कार्यक्रमासाठी मंचावर आमंत्रित दर्यापूरचे तहसीलदार अमोल कुंभार ,जि. प. सभापती बळवंतभाऊ वानखडे ,डॉ. राजेंद्र भट्टड ,डॉ. दिनेश म्हाला,डॉ.ललिताताई देशमुख,तसेच मदत फाउंडेशनच्या अध्यक्ष कु.दीपाली वारुळे,विश्वस्त कु.श्रीविद्या कवीश्वर,कु.पूजा ढेरंगे,कु.मोनिका राऊत यांचे समयोचित मार्गदर्शन झाले.
मदत फाउंडेशन च्या या सामाजिक कार्याबाबत बेलोरा ग्रामपंचायतच्या वतीने सतीशपाटील भारसाकळे, विनोद तराळ, सुनीलपाटील भारसाकळे, विनोद भारसाकळे, पप्पूपाटील भारसाकळे यांनी तथा गोदावरी हॉस्पिटल तर्फे संचालक डॉ राजेंद्र भट्टड ,प्रा.कमलकिशोर खेतान,डॉ.मोरे,अशोक ठाकूर ,कल्पेश भैय्या ,रवी पाचडे,सुनील वासनकर यांनी संपूर्ण मदत फाउंडेशन टीम चा सत्कार केला. शिक्षक संघटनेचे नेते निलेश पारडे यांनी कार्यक्रमादरम्यान सुचविलेल्या सात लहान गरीब मुलांना शिक्षणासाठी दत्तक घेण्याची घोषणा मदत फाउंडेशन चे विश्वस्थ मयूर खेतान यांनी केली. या मदत उपक्रमाला पत्रकार तथा गाडगेबाबा निराधार बालक आश्रमाचे संचालक गजानन देशमुख यांनी हृदय हेलाविणाऱ्या शब्दांनी मनोगत व्यक्त करून मदत फाउंडेशन चमूच्या हृदयाचा ठाव घेतला.दर्यापूर तालुक्यातून वर्ग 12 परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या चि. पियुष दिलीपकुमार अग्रवाल यांचा तसेच विविध कलेमध्ये प्राविण्यप्राप्त कु वेदिका व कु प्राची गजानन पिंजरकर या दोन भगिनींचा उमेश कोठीकर यांनी गौरव केला. पाहुण्यांचे स्वागत प्रा कमलकिशोर खेतान, प्रकाशराव कुटाफळे, अनिलकुमार तुलशान, सौ. उर्मिलाताई खेतान, सतीश भारसाकळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रबद्ध संचलन गाडगेबाबा मंडळाचे अध्यक्ष प्रा गजानन भारसाकळे, प्रास्ताविक कु. दीपाली वारुळे तथा आभार प्रदर्शन हेमंत पाठक यांनी केले. कार्यक्रमाची सांगता विजय विल्हेकर यांनी सादर केलेल्या माय या कवितेने झाली. पत्रकार किरण होले, अमोल कंटाळे,विलास महाजन यांच्यासह गावातील प्रतिष्ठित मंडळी, शिक्षकवृंद, गाडगेबाबा मंडळाचे सदस्य यांची उपस्तिथी लक्षणीय ठरली.
पुण्यामुंबईकडच्या मुलामुलींनी गावाकडील मातीचे नाते जपत फेसबुक मैत्रीचा उत्तम वापर करून सामाजिक भान जपण्याच्या या उपक्रमाबद्दल दर्यापूरवासियांकडून कौतुक आणि आनंद व्यक्त केल्या जात आहे.