जिल्हा परिषद, पंचायत समिती निर्वाचक गणनिहाय प्रारूप मतदार यादी आज होणार प्रसिद्ध

0
15
  • १२ जून पर्यंत हरकती व सूचना स्वीकारणार

वाशिम, दि. ०७ : जिल्हा परिषद व त्याअंतर्गत सहा पंचायत समितींच्या निवडणूक विभाग व पंचायत समिती निर्वाचक गणनिहाय मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार ७ जून २०१९ रोजी वाशिम जिल्हा परिषद व त्याअंतर्गत सहा पंचायत समितींच्या निवडणूक विभाग व पंचायत समिती निर्वाचक गणनिहाय प्रारूप मतदार यादी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय तसेच संबंधित तहसील कार्यालय व संबंधित पंचायत समिती कार्यालय येथे प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

७ जून ते १२ जून २०१९ या कालावधीत प्रारूप मतदार यादीवर संबंधित तहसीलदार कार्यालयाचे तहसीलदार यांच्याकडे हरकती व सूचना दाखल करता येतील. मतदार यादी तयार करण्यासाठी संबंधित तहसीलदार यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. तसेच वाशिम जिल्हा परिषद व त्याअंतर्गत सहा पंचायत समितींच्या निवडणूक विभाग व पंचायत समिती निर्वाचक गणांच्या छापील मतदार याद्या अधिनियमाच्या कलम १३ खाली अधिप्रमाणित करून १५ जून २०१९ रोजी प्रसिद्ध करण्यात येतील. मतदार याद्या माहितीसाठी ठेवण्यात आल्याबाबत तसेच मतदान केंद्रांची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी १८ जून २०१९ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.