मुख्य बातम्या:
कीटकनाशक प्राशन करून 2 शेतकर्यांच्या मृत्यू# #१0 वर्षांपासून अनुकंपाधारका नोकरीच्या प्रतीक्षेत,जि.प.अध्यक्षांना निवेदन# #ग्रामपंचायतमध्ये स्वीकृत सदस्य निवडण्याची गरज - बालू चुन्ने# #राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच बहुजनांचे हित जोपासणारी-चंद्रिकापुरे# #माजी पस सभापती छगनलाल पटले यांचे निधन# #हनुमंत अ‍ॅग्रो कंपनीची १.८५ कोेटींनी फसवणूक# #न्यू चैम्पियन कराटे क्लबच्या विद्यार्थीची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड# #एक शाम देश कें नाम हर्षोल्लास के साथ# #साक्षी पुरावे देऊनही देवरी पोलिसांची कारवाई शून्य# #महाजनादेश यात्रेत ओबीसी आरक्षण पुर्ववत करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा हवेतच विरली

किशोर चलाख यांना जीवन गौरवच्यावतीने काव्यलेखनात प्रथम पुरस्कार

संख (ता.जत),दि.08ः- येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा खोतधुमाळवस्तीचे प्राथमिक शिक्षक किशोर बळीराम चलाख यांनी जीवनगौरव मासिक राज्यस्तरीय महाकाव्य लेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल आमदार किशोर दराडे,जेष्ठ शिक्षणतज्ञ भाऊसाहेब चासकर, जीवन गौरवचे मुख्य संपादक रामदास वाघमारे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र व जीवन गौरव मासिक देऊन सन्मान करण्यात आला.
रामशेज शिक्षण संस्था व जीवन गौरव मासिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दुसरे शिक्षक साहित्य संमेलन नाशिक येथे आयोजित करण्यात आले होते.त्या कार्यक्रमात हा सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाला आ.किशोर दराडे , जेष्ठ शिक्षणतज्ञ भाऊसाहेब चासकर, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व जेष्ठ संपादक उत्तम कांबळे,रामशेज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिवराम बोडके,जीवन गौरवचे मुख्य संपादक रामदास वाघमारे,सांगली जिल्ह्यातील जीवन गौरव मासिकाचे सहसंपादक महादेव हवालदार उपस्थित होते.नुकत्याच गोवा येथे झालेल्या राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेतही त्यांच्या काव्यास “उत्कृष्ट क्रमांक” मिळालेला होता.तसेच अनेक मासिकात,दिवाळी अंकातही त्यांच्या कविता व लेख प्रसिद्ध झालेले आहेत.

Share