खासगी सीबीएसई शाळामंधील बाजारीकरणाच्या विरोधात एनएसयूआयचे उपोषण आंदोलन सुरु

0
19

गोंदिया,दि.०७- सीबीएसई मान्यता प्राप्त व पॅटर्नवर आधारित जिल्हातील खासगी शाळा संचालकाविरूद्ध बेहिशोब फीस व शिक्षणाच्या बाजारीकरणाविरूद्ध जिल्हा प्रशासन व शिक्षणाधिकाèयांनी नियमाप्रमाणे कार्यवाही करावी तसेच गोंदिया पंचायत समिती अंतर्गत सुरू असलेल्या १८ शाळा संचालकाविरूद्ध ४२० चा गुन्हा दाखल करण्यात यावे, या मागणीसाठी येत्या ६ जून पासून एनएसयूआय जिल्हा अध्यक्ष हरिष तुळसकरसह पदाधिकारी व पालकांनी आंबेडकर चौकात आमरण उपोषण आंदोलनाला सुरवात केली आहे.या आंदोलनाला काँग्रेसचे युवा नेते प्रफुल अग्रवाल,अमर वराडे,विशाल अग्रवाल,बजरंगल दलचे प्रमुख देवेश मिश्रा यांच्यासह अनेकांनी पहिल्या दिवशी आंदोलनाला पाठिंबा देत उपस्थिती नोंदविली. आंदोलनात युवक काँग्रेसचे संदीप ठाकूर,आलोक मोंहती, मयुर मेश्राम,चंद्रकात चुटे, सामाजिक कार्यकर्ता व पालक पुजा तिवारी, नगरसेवक निर्मला मिश्रा,शीलू चव्हाण, एकनाथ वहिले, ममता ठाकूर विणा राजकुमार, सिमा बैस यांच्यासह अनेकांनी हजरे लावली असून आज दुसèया दिवशी(दि.७)आंदोलनाला नागरीक व पालकांनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला.तसेच माध्यमिक उपशिक्षणाधिकारी सुनिल मांढरे यांनी भेट देऊन मागण्या एैकून घेतले.

खासगी शाळामध्ये सीबीएसई व आयसीएसईच्या नावावर अवैधरित्या शुल्क आकारुन तसेच पुस्तकविक्रीचा गोरखधंदा करीत असल्याच्या शिक्षण क्षेत्रातील बाजारीकरण व व्यापारीकरणाविरोधात सुरू करण्यात आलेल्या २१ मे ते २४ मे पर्यंतच्या हस्ताक्षर आंदोलनात २६८५ पालकांनी सहभाग घेवून शहर तसेच जिल्हयात सुरू असलेल्या शाळा संचालकाकडून पालकांची केल्या जाणाèया आर्थिक लुटाविरोधात आपले समर्थन दिले आहे.
शहरातील गोंदिया पब्लिक शाळा, प्रोग्रेसिव्ह शाळा, विवेक मंदिर शाळा, साकेत पब्लिक शाळा, पोद्दार शाळा व सेंट झेवियर या शाळेतील व्यवहारासंदर्भात जवळपास ८०० पालकांनी लेखी तक्रार केली. या शाळेत शासनाच्या नियमानुसार पीटीआयचे गठन करण्यात येत नाही, पुस्तका व गणवेश विकत घ्यावे लागते, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी वेगळे गणवेश शाळेतूनच घ्यावे लागते, लेटफीच्या नावावर अतिर्नित शुल्क घेतले जाते, एनसीआरटीच्या पुस्तकाऐवजी खाजगी प्रकाशकाच्या पुस्तकातून अभ्यास केला जातो, दरवर्षी अभ्यासक्रम बदलला जातो. या शाळाविरोधात तक्रारी व पुरावे असल्याने या शाळा विरोधात जिल्हा प्रशासन व शिक्षणाधिकाèयांनी कार्यवाही करावी व शासन नियमानुसार दंडाची qकवा मान्यता रद्द करण्याची कार्यवाही करावी तसेच गोंदिया तालु्नयातील १८ शाळा अवैध असून या शाळेत पालकांनी आपल्या पाल्यांना प्रवेश देवू नये असे आवाहन गटशिक्षणाधिकारी यांनी केले आहे.
शासनाच्या वतीने सदर शाळा अवैध असल्याचे घोषित करूनही सदर शाळा संचालकांनी या शाळा सुरू ठेवल्याने पालक व विद्याथ्र्यांची फसवणूक होण्याची शक्यता लक्षात घेवून या शाळा संचालक व मुख्याध्यापकाच्या विरोधात ४२० अन्वये गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांना करण्यात आली आहे.आंदोलनाला सुरुवात झाली असून प्रशासन काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.