उषा नळगीरे राष्ट्रीय साने गुरुजी संस्कारक्षम पुरस्काराने सन्मानित

0
16

नांदेड,दि.08ः- येथील सामाजिक क्षेत्रात कार्यरत श्रीमती उषा नळगीरे यांना काव्यमित्र संस्था महाराष्ट्र राज्य , पुणे आयोजित सलग 19 व्या वर्षी पुस्तक प्रकाशन आणि पुरस्कार सोहळा कार्यक्रमात साने गुरुजी संस्कारक्षम राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.पुरस्कार कविताताई भोंगाळे ( संचालिका गायत्री इंटर नॅशनल स्कूल पुणे) यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी प्रथमेश जंगम,डॉ. राजाराम त्रिपाठी,सुकनशेठ बाफना,कल्पना गोखे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.या सोहळ्याचे मुख्य संयोजक श्रीमंत राजेंद्र विमलाई सगर(संस्थापक काव्य मित्र संस्था महाराष्ट्र) हे होते.श्रीमती नळगीरे यांचे अनुराधा गुंडेवार( संस्थापिका महर्षी मार्कंडेश्वर प्रतिष्ठाण नांदेड),सीमा अ. राऊतपाटील,(संस्थापिका सेवाव्रत सामाजिक बहू उद्देशीय संस्था नागपूर),पंचवटी संभाजी गोंडाळे(संस्थापिका पंचवटी सामाजिक बहुउद्देशिय संस्था मुखेड),प्रवीण भाकरे ( संस्थापक नवरत्न साहीत्य प्रतिष्ठाण पंढरपूर),मारुती गुंडेवार,पुनम केंद्रे,सुजाता जाधव,चंद्रकांत लांडगे  तसेच इतर मान्यवरांनी अभिनंदन केले.