विज पडून एकाचा मृत्यू तर वादळामुळे घरांचे नुकसान

0
41
गोंदिया,दि.08ः-गोंदिया जिल्ह्यात काल सायकांळी 5 वाजेच्या सुमारास 30 ते 40 किलोमीटर प्रती तास वेगाने वाहनार्या वादळी वार्यामुळे अनेक ठिकाणी झा़डे कोडमडली तर विज पुरवठा सुध्दा खंडीत झाला होता.यातच अर्जुनी मोरगाव,गोंदिया तालुक्यात घरांचे नुकसान झाले.तर सालेकसा तालुक्यात एका युवकाचा अंगावर विज पडल्याने मृत्यू झाल्याची माहिती आप्पती व्यवस्थापन विभागाचे राजन चौबे यांनी दिली आहे.सदर युवकाचे नाव सूर्यप्रकाश चैनलाल पंधरे (वय 24) असे आहे.

कालच्या वादळी वार्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावासंह  गोंदिया शहरातील विज पुरवठा आजही काही ठिकाणी खंडीत आहे तर दिवसभर विजेचा लपंडाव सुरु असल्याने उष्णतेच्या काळात नागरीकांची चांगलीच कुंचबना झाली आहे.गोरेगाव तालुक्यातही या वार्यामुळे काहीघरावरील छताचे टिन उडाल्याचे वृत्त आहे.तिरोडा रेल्वे स्टेशन रोड वर साई प्लाझा जवळ वादळामुळे वाळलेले झाड पडून रस्ता काही वेळा करीत अवरुद्ध झाला. विजेची तारे तुटल्याने परिसरातील विद्दुत पूरवठा खंडित झाला  होता.अर्जुनी मोरगाव तालुक्यात गौरनगर व आसोली येथे वादळी वारा येऊन अंदाजे 30 ते 40 घरांची अंशतः नुकसान झालेले असून तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांमार्फत पंचनामा करणे सुरू झाले आहे.गोरेगाव तालुक्यातील  (तुमखेडा बुज. ) टोली येथील एका घराचे सीमेंट सीट व टिन पत्रे उडाल्याने कुटुंब बाधित झाले आहे.तर गोंदेखारी येथील मुंशी बलराम टेंभरे यांच्याही घराचे नुकसान झाले आहे.