राष्ट्रीय वन्यजीव मंडळांच्या चमूनी केली निमगाव प्रकल्पाची पाहणी

0
21

तिरोडा,दि.08– गेल्या अनेक वर्षापासून रखडलेला निमगाव(आंबेनाला)प्रकल्पाची वास्तविक परिस्थितीचे निरिक्षण करुन त्या प्रकल्पाला मंजुरी देण्यासंबधात शासकीय पातळीवर हालचाली सुरु झाल्या आहेत.त्यानिमित्तानेच या प्रकल्पाच्या जागेचीप्रत्यक्ष पाहणी करण्याकरीता राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची चमू दाखल झाल्याने प्रकल्प मार्गी लागण्याच्या मार्गावर असल्याची माहिती आमदार विजय रहागंडाले यांनी दिली आहे.या प्रकल्पस्थळाची पाहणी वन्य जीव महामंडळाचे सचिव ( टायगर कन्झरवेटर ) श्रीकांत कामडी यांच्यासह आमदार रहागंडाले,वनविभागाचे अधिकारी व संबधित प्रकल्पाचे अधिकारी यांनी केली.प्रकल्प पाहणीचा अहवाल येत्या 25 दिवसात केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत अंतिम मंजुरीकरीता सादर करण्यात येणार आहे.

सदर निमगाव प्रकल्प हा नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोन मध्ये असल्यामुळे १० कि.मी. अंतरातील प्रकल्पास वन्यजीव मंडळाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.त्यातच निमगाव प्रकल्पाचे कार्य ६० टक्के पूर्ण झाले असून तलाव सुरक्षा भिंतीचे पिचिंग, वेस्ट वेअर, कालवा निर्मिती व अन्य कार्य पूर्ण झाल्यामुळे अधिकाऱ्यानी समाधान व्यक्त केले.आमदार विजय रहांगडाले यांनी येत्या दोन दिवसात प्रकल्पाच्या मंजुरी करिता केंद्रीय मंत्री हर्षवर्धन व नितीन गडकरी यांची दिल्लीमध्ये भेट घेणार असल्याचे म्हटले आहे.या प्रकल्पामुळे ५०० हेक्टर जमिनीचे सिंचन होणार असून लाभक्षेत्रातील गावांची संख्या १८ राहिल एवढेच नव्हे तर हा प्रकल्प बफर झोन मध्ये असल्यामुळे शेतीच्या सिंचनाव्यतिरिक्त नागझिरा वन्यजीव अभयारण्य अंतर्गत असलेल्या प्राण्यांच्या पिणाच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी सुटणार आहे.
निमगाव प्रकल्पाला सन १९७२ मध्ये मंजूरी मिळाली असली तरी तो २००६ पर्यंत रखडलेला होता.या प्रकल्पाच्या मंजुरीकरीता या जिल्ह्यातील खासदार व स्थानिक सर्वच आमदारांनी प्रयत्न केले होते. प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनाद्वारे वन विभागाला लागणाऱ्या जमिनीचे FRA निधी ३१ कोटी रुपये राज्यमंत्री मंडळाद्वारे केंद्र शासनास भरणा करण्यात आले आहेत.ज्यामध्ये वनविभागाची जमीन व या भेटी दरम्यान निमगाव प्रकल्पाचे कार्य उपअभियंता कापसे, मदन पटले, संजय बैस, उमेश पटले व निरज सोनेवाने,विवेक ढोरे, किशोर ठाकूर उपस्थित होते.