तालुक्यातील चारही पाणीपुरवठा योजना संकटात

0
15

अर्जुनी मोरगाव,दि.08 : जिल्ह्यात यावर्षी सर्वत्र पाणीटंंचाई निर्माण झाली आहे.त्यातच अर्जुनी मोरगाव तालुक्यात एकूण ४ प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आहेत.यापैकी दोन योजना नवेगावबांध तलावात व दोन योजना गोठणगाव (इटिियाडोह) तलावात आहेत. सध्या तालुक्यातील दोन्ही तलावातील पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे तालुक्यातील चारही प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बंद होण्याच्या स्थितीत आलेल्या आहेत.
अर्जुनी मोरगाव तालुक्यात भीषण पाणीटंचाई आहे; परंतु तालुक्यातील चार पाणी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू असल्यामुळे पाणीटंचाईची तीव्रता कमी आहे. खांबी प्रादेशिक पाणीपुरवठा
योजनेद्वारे 23 गावांना ,सिरेगाव प्रादेशिक योजनेद्वारे 8 गावांना गोठणगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेद्वारे १५ गावांना तर रामपुरी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेद्वारे ८ गावांना पाणीपुरवठा केला जातो. अशा ५४ गावांना पाणीपुरवठा केला जातो. या योजनांच्या माध्यमातून दररोज प्रति कुटुंब ५०० लिटर प्रमाणे ५ हजार कुटुंबांना नियमित पाणीपुरवठा केला जातो. यावर्षी पर्जन्यमान कमी असल्याने तलावातील पाण्याची  पातळी खाेल गेलेली आहे. त्यामुळे योजनांच्या विहिरीत नहराद्वारे येणारे पाणी हे येत्या ४ दिवसांत बंद होऊन पाणीपुरवठा योजना बंद पडतील व तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
पाणीटंचाई निर्माण होऊ नये यासाठी योजनांच्या नहरांचा उपसा करून देण्यात यावा,जेणेकरून तालुक्यातील चारही पाणीपुरवठा योजना सुरळीत सुरू राहतील, असे पत्र व्यवहार जि.प.सदस्य किशो तराेणे यानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांना केला होता.परंतु प्रशासनाकडून आजपर्यंत काेणत्याही हालचाली दिसून आल्या नाहीत. येत्या ४ दिवसांत
पाऊस पडला नाही तर तालुक्यात चारही प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बंद पडून तालुक्यात भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.तरी प्रशासनाने या समस्येकडे लक्ष देऊन
त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी किशोर तरोणे यांनी केली आह