१५ जूनला चिचडोह बॅरेजचे ३८ दरवाजे उघडणार; परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा

0
32

गडचिरोली,दि.८: चामोर्शी तालुक्यातील चिचडोह बॅरेजचे सर्व ३८ दरवाजे १५ जूनला उघडण्यात येणार असून, लगतच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा लघुपाटबंधारे उपविभागाच्या उपकार्यकारी अभियंत्यांनी केले आहे.यासंदर्भात चंद्रपूर येथील लघुपाटबंधारे उपविभागाच्या उपकार्यकारी अभियंत्यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, चिचडोह बॅरेजचे सर्व ३८ दरवाजे १२ ऑक्टोबर २०१८ पासून बंद करण्यात आले होते. परंतु आता पावसाळा सुरु झाल्याने बॅरेजमध्ये साठविलेला पाणीसाठा कमी करण्यासाठी सर्व ३८ दरवाजे १५ जूनला उघडण्याचे नियोजित आहे. त्यामुळे नदीतील निम्न भागातील पाण्याची पातळी वाढणार आहे. वाढीव पाणी पातळीमुळे जीवित व वित्त हानी होऊ नये म्हणून लगतच्या सर्व गावांतील नागरिकांनी नदी काठावर जाणे टाळावे, तसेच शेतात काम करताना सतर्क राहावे. मार्कंडा देवस्थानाच्या नदीत आंघोळ करताना, मासेमारी करताना, वाळू काढताना तसेच नदीतून ये-जा करताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन उपकार्यकारी अभियंत्यांनी केले आहे.