मनोऱ्यावरुन होणार पर्यटक व पक्षी अभ्यासकांना हमखास पक्षी दर्शन

0
16

गोंदिया, दि.४ : राज्याच्या पूर्वेस असलेला गोंदिया जिल्हा वनसंपदेने नटलेला आहे. धानाचे कोठार म्हणून ओळखला जाणारा हा जिल्हा पर्यटनस्थळांसाठीही प्रसिध्द आहे. दुर्मिळ झालेल्या सारस पक्षांचे या जिल्हयात अस्तीत्व असून या पक्षांचे हमखास दर्शन पर्यटकांना जिल्हयात होते. विदेशी पक्ष्यांना काही कालावधीसाठी वास्तव्यास येण्याकरीता पूरक वातावरण या जिल्हयात आहे.
वन विभागाने पुढाकार घेऊन जिल्हा पर्यटन समितीच्या माध्यमातून मिळालेल्या निधीतून पक्षी अभ्यासकांना व पर्यटकांना तलावांवर येणाऱ्या विदेशी पक्षांचा अभ्यास करण्याकरीता व पाहण्याकरीता तलावांच्या काठावर मनोरे उभारण्याचे काम हाती घेतले आहे. जिल्हयातील पाच ठिकाणी उंच निरीक्षण मनोरे उभारण्यात येत आहे.
जिल्हयातील अनेक तलावांवर तसेच येथील माजी मालगुजार तलावांवर दरवर्षी मध्यपूर्व एशिया, मध्य युरोप, सायबेरीया, मंगोलिया, लेह, लदाख, अमेरिका, इंग्लड, ऑस्ट्रिया, इंडोनेशियातून, पाकीस्तान, दक्षीणपूर्व आशिया, उत्तर युरोप, उत्तर अमेरिका, दक्षीण युरोप, पूर्व चीन, बांग्लादेश, मध्य आशिया, आखाती देशातून विविध प्रजातीचे पक्षी हिवाळयात येथे येतात. यामध्ये ग्रे लेग गुज, बार हेडेड गुज, कॉम्ब डक, कॉमन टेल, स्पॉट बिल्ड डक, नॉर्थन पिंटेल, नॉर्थन शॉवेलर, युरोशिएन विंजेल, रेड क्रीस्टेड पोचार्ड, फेरोजीनस पोचार्ड, इंडियन पिट्टा, ईमेरल्ड डोव्ह, कॉमन क्रेन यासारखे साडेतीनशेच्यावर विविध प्रजातीचे पक्षी हिवाळयात येथे येतात. बार हेडेड गुज हा पक्षी तर उंच हिमालय ओलांडून जिल्ह्यात दाखल होतो. जिल्ह्यातील तलाव व माजी तलावातील किटक तसेच देवधान हे पक्षी आवडीने खातात.
प्रजननासाठी जिल्ह्यातील काही माजी मालगुजारी तलाव, नवेगावबांध राष्ट्रीय पक्षी अभयारण्य जवळील तलाव, नागझिराचे वनवैभव पूरेसे असल्याने पक्षांना पहाण्यासाठी पर्यटकांची गर्दी असते. पर्यटकांना हमखास पक्षीदर्शन व्हावे यासाठी जिल्हा पर्यटन समितीने वनविभागाला पर्यटकांना हमखास पक्षीदर्शन व्हावे यासाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे.
जिल्हयातील गोंदिया तालुक्यातील परसवाडा येथील माजी मालगुजारी तलावाच्या काठावर ६० फुट उंचीच्या मनोऱ्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे. याशिवाय अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कोहळीटोला व शृंगारबंद, आमगाव तालुक्यातील मानेगाव आणि गोंदिया तालुक्यातील लोहारा येथील माजी मालगुजारी तलावाच्या काठा
जिल्हा पर्यटन समितीच्या माध्यमातून याकरीता प्रत्येकी पाच लाखांचा निधी देण्यात आला आहे. बाहेर देशातून येणाऱ्या विविध पक्षांची ओळख, नोंद व त्यांची गणना व्हावी तसेच अभ्यासकांना त्यांच्या अचूक नोंदी घेता याव्या तसेच पर्यटकांना पक्षी बघता यावे यासाठी हा मनोरा उभारण्यामागचा मुख्य हेतू आहे. नवेगावबांध येथील मालडोंगरी तलाव आणि बहुतांशी मामा तलाव ग्रीन पोचार्ड, कर्स्ड पोचार्ड व बगळयांच्या काही जाती मोठ्या प्रमाणात विदेशातून स्थलांतर करतात. हा परिसर व वातावरण या पक्ष्यांना पोषक असल्याने पिले जन्माला घातल्यावर ते आपल्या मायदेशी परत फिरतात. ज्या येथील तलावाशेजारी हे मनोरे लावण्यात येत आहे. तेथील देखभाल व देखरेख करण्याचे काम स्थानिक वनव्यवस्थापन समितीला देण्यात येणार आहे. पर्यटकांकडून घेण्यात येणाऱ्या शुल्काचा उपयोग मनोऱ्याच्या देखभालीसाठी करण्यात येणार आहे. दुर्मिळ सारसांच्या संरक्षणाकरीता व इतर पक्ष्यांच्यासाठी पोषक वातावरणाकरीता शेतकरी व वनसमितीला काही बाबी वनविभागातील सुचविण्यात आल्या आहेत. वनधिकाऱ्यांच्या माध्यमातून यासाठी त्यांच्या नियमीत बैठका व शिबीरे घेण्यात येत आहे.
तलावाचे सौंदर्य तसेच निसर्गाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने पक्ष्यांसाठी पोषक वातावरण निर्मित तसेच अभ्यासकांसाठी हक्काचे निरीक्षणपीठ तयार करण्याचा हेतू व मुख्य म्हणजे पर्यटनाला चालना हा उद्देश पूर्ण होत आहे. पर्यटकांना व पक्षीनिरीक्षकांना मनोऱ्यावरुन विविध प्रजातीची पक्षी पाहता यावे तसेच त्यांचा अभ्यास करता यावा हा यामागचा मुख्य उद्देश असून स्थानिकांना या माध्यमातून रोजगार उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
विवेक ख़डसे
जिल्हा माहिती अधिकारी,गोंदिया