पोलीस कर्मचाऱ्यांकरिता नि:शुल्क आरोग्य शिबिर

0
22

गोंदिया,दि.08 : पोलीस मुख्यालय गोंदिया येथे पोलीस कल्याण सप्ताहानिमित्त पोलीस दलातील पोलीस अधिकारी, कर्मचारी, मंत्रालयीन स्टाफ व त्यांच्या कुटुंबीयांकरिता नि:शुल्क अरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. .

या शिबिरात डॉ. विनायक रूखमोडे, डॉ. हिम्मत मेश्राम, डॉ. राजेंद्र जैन, डॉ. गरिमा अरोरा, डॉ. मानस श्रीवास्तव, डॉ. मनोज राऊत, डॉ. योगेश पटले, डॉ. अनिल आटे, डॉ. शैलेश कुकडे, डॉ. जुली जैन, डॉ. मुकेशा मेश्राम, डॉ. गोविंद पावळे आदी डॉक्टर उपस्थित होते. पोलीस अधीक्षक विनीता साहू यांच्या हस्ते डॉ. विनायक रूखमोडे व डॉ. हिम्मत मेश्राम यांना रोपटे व भेटवस्तू देऊन त्यांच्यासह उपस्थित डॉक्टरांचे स्वागत केले. डॉ. विनायक रूखमोडे, डॉ. हिम्मत मेश्राम, डॉ. राजेंद्र जैन व डॉ. शैलेश कुकडे यांनी उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांना संबोधित करून तंबाखू व दारू सेवनाने शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात. त्यामुळे व्यसनापासून दूर राहण्याकरिता व आपले शरीर निरोगी ठेवण्याकरिता त्यांनी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले. शिबिरात पोलीस अधीक्षक यांच्यासह उपअधीक्षक सोनाली कदम, पोलीस निरीक्षक दिनकर ठोसरे, उमेश पाटील, सुधीर घोनमोडे, राखीव पोलीस निरीक्षक कमलाकर घोटेकर, राखीव पोलीस उपनिरीक्षक दीपक गेडाम तसेच जिल्ह्यातील पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिराचे संचालन पूनम मंजुटे यांनी केले. यशस्वितेसाठी दीनकर ठोसरे, सुधीर घोनमोडे, कमलाकर घोटेकर, दीपक गेडाम, लिओनार्ड मार्टिन, राजू डोंगरे, डी.आय. मुस्तफा सरवर, राऊत, उईके, प्रधान, येडे, रोशनी चव्हाण यांनी सहकार्य केले. .