आश्वासनानंतर एनएसयुआयचे उपोषण मागे

0
19

गोंदिया,दि.09 : जिल्ह्यातील खासगी इंग्रजी  माध्यमांच्या शाळेत सुरू असलेला सावळागोंधळ दुर व्हावा तसेच शैक्षणिक शुल्क व शालेय साहित्य विक्रीचा गोरखधंद्यावर नियंत्रण रहावे, या मुख्य मागणीला घेऊन एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष हरिष तुळसकर यांनी 6 जून पासून उपोषण सुरू केलेल्या उपोषणाची सांगता 8 जून रोजी झाली.उपोषण आंदोलनादरम्यान तुळसकर यांची प्रकृती ढासळत असल्याचे प्रशासनाच्या लक्षात येताच आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या मध्यस्थीने शिक्षणाधिकारी कचवे,उल्हास नरड व उपशिक्षणाधिकारी सुनिल मांढरे यांच्या उपस्थितीत निंबू पाणी पाजून या आंदोलनाची सांगता करण्यात आली.

सदर उपोषण आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकारी यांनी शिक्षण विभागाच्या अधिकार्यांना निर्देश देत सर्व प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले.त्यानुसार शिक्षण विभागाने येत्या 25 जूनपर्यंत सर्वच शाळांची चौकशी करुन अनधिकृत व नोंदणी नसलेल्या शाळांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने उपोषणकर्त्यांने (दि.८) आंदोलन मागे घेतले. ठराविक वेेळेत कारवाई न झाल्यास पुन्हा 25 जूनपासून आंदोलन सुुरु करण्याचा इशारा सुध्दा दिला आहे.
एकदंरीत २६ जूनपर्यंत शिक्षण शुल्कपासून शालेय साहित्याची समस्या मार्गी लागतील, असे आश्वासन शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी दिले.या आश्वासनावर उपोषणकत्र्यांनी उपोषण मागे
घेतले. दरम्यान या उपाेषणाला आमदार गाेपालदास अग्रवाल, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी तसेच अनेक पालकांनी समर्थन दिले होते. यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आलोक मोहंती, नगरसेविका शिलू ठाकुर, माजी नगरसेवक राकेश ठाकूर,संदिप ठाकूर,पुजा तिवारी,देवा रुसे,भागवत मेश्राम,सुनिल तिवारी, क्रांती जायस्वाल, पराग अग्रवाल, गाैरव वंजारी, योगेश ठाकरे, अजीत गांधी,जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी,स्नेहा गौतम,मोंटू पुरोहित,गुरमित चावला,एकनाथ वहिले आदी उपस्थित होते.