मुख्य बातम्या:
ईव्हीएममुळे लोकशाही धोक्यात# #मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर, वाचा कुणाला मिळाले कोणते खात# #विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून २८ विधेयके मांडणार# #ट्रक-कारच्या धडकेत चार शिक्षक जखमी;बदली आदेश घेऊन जाताना अपघात# #रापम अधिकाऱ्यांच्या बचावासाठी तक्रारी गहाळ केल्या -नरेश जैन# #संघटनेशिवाय सामाजिक लढा अशक्य:- मनोहर चंद्रिकापुरे# #ग्राम विकास मंत्रालय व जिल्हा परिषद गोंदिया ने केली शिक्षकांची दिशाभूल# #मुख्याधिकाऱ्यास मारहाणप्रकरणी दोन माजी नगरसेवकांना ५ वर्षांचा सश्रम कारावास# #विजय वड्डेटीवर विधानसभेचे नवे विरोधी पक्षनेते, विरोधकांत एकमत# #मंत्रिमंडळ विस्ताराला सुरुवात; पहिल्या शपथेचा मान आयात नेत्यांना

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची २९४ जयंती साजरी

राजेभक्षर जमादार/संख(ता.जत),दि.0९ःः दरवर्षीप्रमाणे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर युवा प्रतिष्ठानच्या वतीने राजमाता अहिल्या देवी होळकर यांची २९४ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.संख येथील मुख्य शिवाजी चौकात रविवारी सायंकाळी ४ वाजता राजमाता अहिल्या देवी होळकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. गावातुन भव्य मीरवणुक काढण्यात आली, यावेळी कार्यक्रमसाठी उपस्थित मान्यवर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर कमिठीचे अध्यक्ष अप्पु दर्गाकर ,विठ्ठल पुजारी ग्रामपंचायत सदस्य, अमगोंड पुजारी,लछाप्पा हुबनूर ,राजु लोगांव ,रावसाहेब सबई ,बिरू कळ्ळी ,बिळानसिध्द सबई , यांच्या सह ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.

Share