जि. प. हायस्कुल लाखांदुची आस्था सुखदेवे विद्यालयातून प्रथम

0
17
लाखांदुर,दि.10 :राज्य परिक्षा मंडळाच्यावतीने नुकतेच दहावीचा निकाल जाहीर झाला असून लाखांदुर येथील जि. प. हाय. तथा कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थीनी आस्था सुखदेवे हिने हेल्थकेअर या विषयात १०० पैकी ९९ गुण मिळविले.तर ८६.८०%  गुण घेऊन विद्यालयातून प्रथम क्रमांक मिळविला.तर आकांक्षा वकेकार हिने ८५.४०% गुण घेत द्वितीय व जयेश भागडकरने ८३% गुण घेत तृतीय क्रमांक मिळविला.सदर शाळेत वर्ग ९ ते १२ च्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान अंतर्गत हेल्थकेअर हा अभ्यासक्रम २०१७ या वर्षापासुन सुरू करण्यात आलेला होता. यावर्षी या विषयाची प्रथमच परिक्षा होती. सर्व ऊत्तीर्ण विद्यार्थ्यांचे सौ.पडोळे,श्री.गावडकर,बुुुरडे,ठाकरे,दोनाडकर यांच्यासह शाळा समिती अध्यक्ष तथा  जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, प्राचार्य के एस ईनमुलवार यांनी अभिनंदन केले आहे.