ज्येष्ठ अभिनेते आणि साहित्यिक गिरीश कर्नाड यांचे निधन

0
15

मुंबई,दि.10 – जेष्ठ अभिनेते, लेखक आणि नाटककार गिरीश कर्नाड यांचे निधन झाले. वयाच्या 81 व्या वर्षी बंगळुरु येथील राहत्या त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवस ते आजारी होते. अखरे सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली.कर्नाड हे कन्नड भाषिक लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते होते. दाक्षिणात्य चित्रपटांसोबत हिंदी चित्रपटांतही त्यांनी काम केले होते. एक था टायगर, टायगर जिंदा है, चॉक अँड डस्टर, शिवाय यांसारख्या चित्रपटांत त्यांनी काम केले आहे. स्मिता पाटील यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘उंबरठा’ या मराठी चित्रपटातही त्यांनी काम केले आहे. तर ययाति, तुघलक. हयवदन ही त्यांनी लिहिलेली कन्नड नाटकं गाजली आहेत. गिरीड कर्नाड यांना दहावेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळालेला आहे.कर्नाड यांना 1974 मध्ये पद्मश्री, 1992 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते. 1994 मध्ये त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. तसेच 1998 मध्ये ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

राष्ट्रपती रामनाथ गोविंद यांनीदेखील गिरीश कर्नाड यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ”तुमच्या जाण्यानं सांस्कृतिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, साहित्य, कला आणि वैचारिक क्षेत्रातील एक महान व्यक्तिमत्व आपण गमावले आहे, अशा शब्दांत आपली श्रद्धांजली अर्पण केली आहे.