मुख्य बातम्या:
कीटकनाशक प्राशन करून 2 शेतकर्यांच्या मृत्यू# #१0 वर्षांपासून अनुकंपाधारका नोकरीच्या प्रतीक्षेत,जि.प.अध्यक्षांना निवेदन# #ग्रामपंचायतमध्ये स्वीकृत सदस्य निवडण्याची गरज - बालू चुन्ने# #राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच बहुजनांचे हित जोपासणारी-चंद्रिकापुरे# #माजी पस सभापती छगनलाल पटले यांचे निधन# #हनुमंत अ‍ॅग्रो कंपनीची १.८५ कोेटींनी फसवणूक# #न्यू चैम्पियन कराटे क्लबच्या विद्यार्थीची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड# #एक शाम देश कें नाम हर्षोल्लास के साथ# #साक्षी पुरावे देऊनही देवरी पोलिसांची कारवाई शून्य# #महाजनादेश यात्रेत ओबीसी आरक्षण पुर्ववत करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा हवेतच विरली

काँग्रेस नगराध्यक्ष विरोधात बालविवाह प्रतिबंधकचा गुन्हा दाखल

मेहकर.दि १०ः- काँग्रेसचे नगराध्यक्ष कासम गवळी व अन्य दोघांविरोधात मेहकर पोलिसांनी बालविवाह प्रतिबंधक अधिनियम नुसार गुन्हा दाखल केला आहे. बाल विकास प्रकल्प अधिकारी डिगांबर महादु खटावकर यांच्या तक्रारी वरून ही कारवाई झाली आहे. तक्रारी त नमुद आहे की २८ एप्रिल ला यशवंत मैदान शाळा क्र.३ चे आवारात नगराध्यक्ष कासम गवळी यांच्या माध्यमातून सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. अँड उल्हासराव जाधव यांनी जिल्हाधिकारी, बुलढाणा यांचे कडे याबाबत निवेदन देऊन चित्रीकरण पुरावा सह शासनाच्या लक्षात आणून दिले की एकूण २४ विवाहापैकी १२ पेक्षा जास्त जोडप्यामध्ये वधूचे वय १८ पेक्षा कमी आहे.या बालविवाह प्रकारास नगराध्यक्ष कासम गवळी,जंगली रेघीवाले,हसन खलीताऊ हे तिघे जबाबदार आहेत. या तक्रारीचे आधारे बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी पत्रव्यवहार करून वयाची माहिती घेतली असता ६ वधू अल्प वयीन असल्याचे निदर्शनास आले.त्यामुळे बाल विकास प्रकल्प अधिकारी डिगांबर खटावकर यांनी या बालविवाहास नगराध्यक्ष कासम गवळी, जंगली रेघीवाले, व हसन खलीताऊ हे जबाबदार दाखविल्या ने पोलिसांनी या तिघांविरोधात बालविवाह प्रतिबंधक अधिनियम नुसार गुन्हा नोंद केला आहे. तर सदर बालविवाह करणारे ,विधी करणारे, चालना देणारे हे सर्व जण निष्पन्न करून फौजदारी कारवाई करण्यात यावी असे ही तक्रारी त म्हटले आहे.

Share