मुख्य बातम्या:
कीटकनाशक प्राशन करून 2 शेतकर्यांच्या मृत्यू# #१0 वर्षांपासून अनुकंपाधारका नोकरीच्या प्रतीक्षेत,जि.प.अध्यक्षांना निवेदन# #ग्रामपंचायतमध्ये स्वीकृत सदस्य निवडण्याची गरज - बालू चुन्ने# #राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच बहुजनांचे हित जोपासणारी-चंद्रिकापुरे# #माजी पस सभापती छगनलाल पटले यांचे निधन# #हनुमंत अ‍ॅग्रो कंपनीची १.८५ कोेटींनी फसवणूक# #न्यू चैम्पियन कराटे क्लबच्या विद्यार्थीची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड# #एक शाम देश कें नाम हर्षोल्लास के साथ# #साक्षी पुरावे देऊनही देवरी पोलिसांची कारवाई शून्य# #महाजनादेश यात्रेत ओबीसी आरक्षण पुर्ववत करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा हवेतच विरली

छत्तीसगडचा चोरटा रेल्वे पोलिसांच्या जाळ्यात

गोंदिया,दि.11 : स्थानिक गणेशनगर येथील दिगंबर कृष्णराव कुथेकर यांच्या मालकीची दुचाकी घरासमोर उभी असताना अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. ही घटना ४ जूनच्या सकाळी ८ ते दुपारी ४ वाजता दरम्यानची आहे. चोरीस गेलेल्या दुचाकीचे क्र.एमएच-३१/बीएफ-७८३९ असे आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरून गोंदिया शहर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.गोंदिया : प्रवाशांचे किमती साहित्य व पैसे चोरी करणार्‍या छत्तीसगड राज्यातील रायगड जिल्ह्याच्या भामट्याला गोंदिया रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी त्याच्याजवळून चोरीचा एक मोबाईल व काही प्रशावांचे महत्वाचे कागदपत्र जप्त केले. असर अली अंसार अली असे आरोपीचे नाव आहे.
गोंदिया रेल्वेस्थानकावर दुपारी ४ वाजता आलेल्या शालीमार एक्सप्रेसमधून संशयास्पदरित्या खाली उतरताना त्याला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने उडावीउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांनी त्याच्या साहित्याची तपासणी केली असता चोरीचा एक मोबाईल व काही प्रवाश्यांचे महत्वाचे कागदपत्र आढळले. विशेष म्हणजे, आरोपी हा प्रवाशादरम्यान एकदा प्रवासी पाहून त्याच्याशी ओळख करायचा व नोकरी आदीचे तसेच आजारी असल्याचे भासवून प्रवाशांना विश्‍वासात घेऊन त्यांचे किमती साहित्य व महत्वाचे कागदपत्रे लंपास करायचा. दरम्यान, गोंदिया रेल्वे पोलिसांनी आरोपीला पुढील तपासाकरिता नागपूरच्या स्पेशल टॉस्क टीमच्या सुर्पुद केले आहे

Share