जागतिक बाल कामगार विरोधी दिनानिमीत्त जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

0
22

गोंदिया दि.११. : : सहायक कामगार आयुक्त कार्यालय व राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प समिती गोंदिया यांच्या संयुक्त वतीने १२ जून जागतिक बाल कामगार विरोधी दिनानिमित्ताने जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या जनजागृती कार्यक्रमात शासनाने नव्याने तयार केलेले बाल कामगार अधिनियम, राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प योजनेविषयीची माहिती, बाल कामगार अनिष्ठ प्रथेविरुघ्द जनजागृती, शिक्षणाचे महत्व इत्यादीबाबत जनजागृती होण्याकरीता कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात शिक्षणाधिकारी, राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प समिती सदस्या, सरकारी कामगार अधिकारी तसेच इतर अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
जनजागृती कार्यक्रमात विशेष प्रशिक्षण केंद्र, यादव चौक,गोंदिया येथे सकाळी ९ वाजता जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे. तसेच जिल्ह्यातील कोणत्याही ठिकाणी बाल कामगार काम करतांना आढळल्यास सहायक कामगार आयुक्त कार्यालय, जे.आर.कॉम्पलेक्स, श्री टॉकीज रोड, गोंदिया येथे दूरध्वनी क्रमांक ०७१८२-२३६५९५ यावर आपली तक्रार नोंदवावी, जेणेकरुन गोंदिया जिल्हा बाल कामगार मुक्त करण्यास सहकार्य होईल. असे सहायक कामगार आयुक्त गोंदिया यांनी कळविले आहे.