मुख्य बातम्या:
कीटकनाशक प्राशन करून 2 शेतकर्यांच्या मृत्यू# #१0 वर्षांपासून अनुकंपाधारका नोकरीच्या प्रतीक्षेत,जि.प.अध्यक्षांना निवेदन# #ग्रामपंचायतमध्ये स्वीकृत सदस्य निवडण्याची गरज - बालू चुन्ने# #राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच बहुजनांचे हित जोपासणारी-चंद्रिकापुरे# #माजी पस सभापती छगनलाल पटले यांचे निधन# #हनुमंत अ‍ॅग्रो कंपनीची १.८५ कोेटींनी फसवणूक# #न्यू चैम्पियन कराटे क्लबच्या विद्यार्थीची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड# #एक शाम देश कें नाम हर्षोल्लास के साथ# #साक्षी पुरावे देऊनही देवरी पोलिसांची कारवाई शून्य# #महाजनादेश यात्रेत ओबीसी आरक्षण पुर्ववत करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा हवेतच विरली

१३ जुलैला राष्ट्रीय लोक अदालत;४ जुलैपर्यंत अर्ज सादर करावे

गोंदिया दि.११. : : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली यांच्या निर्देशानुसार व राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय गोंदिया यांचेमार्फत जिल्हा न्यायालय, कामगार न्यायालय तसेच जिल्ह्यातील तालुका विधी सेवा समित्यामार्फत सर्व तालुका न्यायालयामध्ये १३ जुलै रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले.
या लोकअदालतीमध्ये न्यायालयात दाखल करण्यापूर्वीचे प्रकरणे तसेच न्यायालयात दाखल असलेली तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, एन.आय.ॲक्ट कलम १३८, बँक रिकव्हरीची प्रकरणे, वैवाहिक/कौटुंबिक वादाची प्रकरणे, कामगारांची प्रकरणे, भूसंपादनाची प्रकरणे, दिवाणी प्रकरणे- भाडे, बँक वसुली, प्राधिकरणाची कर्ज वसुली प्रकरणे, विद्युत व पाणी बिलाची (चोरीची प्रकरणे सोडून) तसेच सर्वच प्रकारची तडजोडपात्र दाखल तसेच दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत. प्रकरणे सामंजस्याने मिटविण्याकरीता न्यायाधीश, तज्ञ वकील व सामाजिक कार्यकर्ते यांचे पॅनल मदत करणार आहे. ज्या पक्षकारांना आपली दाखल प्रकरणे या लोकअदालतीमध्ये तडजोडीकरीता ठेवायची आहेत त्यांनी संबंधित न्यायालयात ४ जुलै २०१९ पर्यंत आपला अर्ज सादर करावा. तरी सर्व संबंधित पक्षकारांनी त्यांची प्रकरणे या लोकअदालतीमध्ये तात्काळ निकाली काढून या संधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुहास माने आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एम.बी.दुधे यांनी केले आहे.

Share