मुख्य बातम्या:
ईव्हीएममुळे लोकशाही धोक्यात# #मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर, वाचा कुणाला मिळाले कोणते खात# #विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून २८ विधेयके मांडणार# #ट्रक-कारच्या धडकेत चार शिक्षक जखमी;बदली आदेश घेऊन जाताना अपघात# #रापम अधिकाऱ्यांच्या बचावासाठी तक्रारी गहाळ केल्या -नरेश जैन# #संघटनेशिवाय सामाजिक लढा अशक्य:- मनोहर चंद्रिकापुरे# #ग्राम विकास मंत्रालय व जिल्हा परिषद गोंदिया ने केली शिक्षकांची दिशाभूल# #मुख्याधिकाऱ्यास मारहाणप्रकरणी दोन माजी नगरसेवकांना ५ वर्षांचा सश्रम कारावास# #विजय वड्डेटीवर विधानसभेचे नवे विरोधी पक्षनेते, विरोधकांत एकमत# #मंत्रिमंडळ विस्ताराला सुरुवात; पहिल्या शपथेचा मान आयात नेत्यांना

तुमसरचा नगराध्यक्षानी केली मुख्यमंत्र्याकडे ३० कोटींची मागणी

तुमसर,दि.११: भंडारा जिल्ह्यातील ब वर्ग असलेल्या तुमसर नगरपरिषदेच्या विविध विकास कामासांठी नगराध्यक्ष इंजि.प्रदिप पडोळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत ३० कोटी रुपयाच्या मागणीचे निवेदन सादर केले.यावेळी भंडारा- गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनिल मेंढे व विधान परिषद सदस्य डॉ. परिणय फुके उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस यांनी लवकरच सदर निधी मंजूर करण्याचे आश्वासन दिले.
‘ब‘ वर्ग नगरपरिषद असून क्षेत्रातील नागरिकांना सोयी सुविधा पुरविण्याचा दृष्टीने नगरपरिषद क्षेत्रात विविध विकास कामे करण्याकरिता शासनाच्या विविध योजनेअंतर्गत निधीची आवश्यकतेची गरज आहे.यामध्ये कमर्शिअल कॉम्प्लेक्स इमारत बांधकाम,नगरपरिषद माकडे शाळा इमारतीचे बांधकाम करणे, नगरपरिषदेचा मोकळ्या जागेवर स्विमिंग पुलकम स्केटिंग ग्राऊंडचे बांधकाम करणे, शहरातील विविध ठिकाणी समाज भवन, व्यायामशाळा, वाचनालय व सभामंडपाचे बांधकाम करणे, नगरपरिषद ढंगारे शाळा इमारत व कमर्शिअल कॉम्प्लेक्सचे बांधकाम करणे. विशेष रस्ता अनुदान योजना- शहरातील विविध रस्त्यांचे सिमेंटिकरण व नाली बांधकाम करणे. सर्वसाधारण रस्ता अनुदान योजना- शहरातील विविध रस्त्यांचे सिमेंटिकरण, नाली व पेव्हिंग ब्लॉक बसविण्यासह इतर आवश्यक असणाèया विकासकामांसाठी तुमसर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष तथा भंडारा जिल्हा भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष इंजि. प्रदीपजी पडोळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथील वर्षा निवस्थानी भेटून एकूण ३० कोटी रुपयांची मागणी केली आहे.

Share