मुख्य बातम्या:
कीटकनाशक प्राशन करून 2 शेतकर्यांच्या मृत्यू# #१0 वर्षांपासून अनुकंपाधारका नोकरीच्या प्रतीक्षेत,जि.प.अध्यक्षांना निवेदन# #ग्रामपंचायतमध्ये स्वीकृत सदस्य निवडण्याची गरज - बालू चुन्ने# #राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच बहुजनांचे हित जोपासणारी-चंद्रिकापुरे# #माजी पस सभापती छगनलाल पटले यांचे निधन# #हनुमंत अ‍ॅग्रो कंपनीची १.८५ कोेटींनी फसवणूक# #न्यू चैम्पियन कराटे क्लबच्या विद्यार्थीची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड# #एक शाम देश कें नाम हर्षोल्लास के साथ# #साक्षी पुरावे देऊनही देवरी पोलिसांची कारवाई शून्य# #महाजनादेश यात्रेत ओबीसी आरक्षण पुर्ववत करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा हवेतच विरली

न्यायालय परिसरात जागतिक पर्यावरण दिन कार्यक्रम

गोंदिया दि.११:: राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालय परिसरात ६ जून रोजी जिल्हा न्यायाधीश-२ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए.जी.जोशी यांच्या अध्यक्षतेखाली त्यांचे हस्ते वृक्षारोपण करुन जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात करण्यात आला. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एम.बी.दुधे, सह दिवाणी न्यायाधीश एन.आर.वानखडे, मुख्य न्यायदंडाधिकारी एन.जी.देशपांडे, सह दिवाणी न्यायाधीश जे.एम.चव्हाण, आर.डी.पुनसे, व्ही.आर.आसुदानी, व्ही.आर.मालोदे, पी.सी.बच्छले, व्ही.के.पुरी, ए.पी.बोरकर उपस्थित होते. याप्रसंगी सर्व न्यायीक अधिकारी यांनी प्रत्येकी एक झाड लावून वृक्षारोपण केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले

Share