मुख्य बातम्या:
कीटकनाशक प्राशन करून 2 शेतकर्यांच्या मृत्यू# #१0 वर्षांपासून अनुकंपाधारका नोकरीच्या प्रतीक्षेत,जि.प.अध्यक्षांना निवेदन# #ग्रामपंचायतमध्ये स्वीकृत सदस्य निवडण्याची गरज - बालू चुन्ने# #राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच बहुजनांचे हित जोपासणारी-चंद्रिकापुरे# #माजी पस सभापती छगनलाल पटले यांचे निधन# #हनुमंत अ‍ॅग्रो कंपनीची १.८५ कोेटींनी फसवणूक# #न्यू चैम्पियन कराटे क्लबच्या विद्यार्थीची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड# #एक शाम देश कें नाम हर्षोल्लास के साथ# #साक्षी पुरावे देऊनही देवरी पोलिसांची कारवाई शून्य# #महाजनादेश यात्रेत ओबीसी आरक्षण पुर्ववत करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा हवेतच विरली

महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेखाली तिघांना अनुज्ञेय रक्कम मंजूर

मुंबई, दि. 11 : महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेखाली तीन जणांना अनुज्ञेय रक्कम मंजूर करण्यात आली आहे.
मेजर सागर प्रकाश परदेशी यांना राष्ट्रपती सचिवालयाच्या अधिसूचनेनुसार
सेना पदक हे प्रदान करण्यात आले आहे. मेजर सागर प्रकाश परदेशी यांना
महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेखाली अनुज्ञेय असलेले 12 लाख रुपये अनुदान
देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत 50 टक्के म्हणजे 6 लाख रुपये शासकीय
अनुदानातून तर उर्वरित 50 टक्के म्हणजेच 6 लाख रुपये मुख्यमंत्री सहायता
(कारगिल) निधीतून देण्यात येणार आहेत.
शिपाई खराडे संदीप कैलास यांना राष्ट्रपती सचिवालयाच्या अधिसूचनेनुसार
सेना पदक हे प्रदान करण्यात आले आहे. शिपाई खराडे संदीप कैलास यांना
महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेखाली अनुज्ञेय असलेले  6 लाख रुपये अनुदान
देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत 75 टक्के म्हणजे 4 लाख 50 हजार रुपये
शासकीय अनुदानातून तर उर्वरित 25 टक्के म्हणजेच 1 लाख 50 हजार रुपये
मुख्यमंत्री सहायता (कारगिल) निधीतून देण्यात येणार आहेत.
लांस नायक साबळे सचिन भिकोबा यांना राष्ट्रपती सचिवालयाच्या
अधिसूचनेनुसार सेना पदक प्रदान करण्यात आले आहे. लांस नायक साबळे सचिन
भिकोबा यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेखाली अनुज्ञेय असलेले  23
हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. सातारा जिल्हा सैनिक कल्याण
अधिकारी यांच्या मार्फत लांस नायक साबळे सचिन भिकोबा यांना ही रक्कम
देण्यात येणार आहे.

Share