मुख्य बातम्या:
कीटकनाशक प्राशन करून 2 शेतकर्यांच्या मृत्यू# #१0 वर्षांपासून अनुकंपाधारका नोकरीच्या प्रतीक्षेत,जि.प.अध्यक्षांना निवेदन# #ग्रामपंचायतमध्ये स्वीकृत सदस्य निवडण्याची गरज - बालू चुन्ने# #राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच बहुजनांचे हित जोपासणारी-चंद्रिकापुरे# #माजी पस सभापती छगनलाल पटले यांचे निधन# #हनुमंत अ‍ॅग्रो कंपनीची १.८५ कोेटींनी फसवणूक# #न्यू चैम्पियन कराटे क्लबच्या विद्यार्थीची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड# #एक शाम देश कें नाम हर्षोल्लास के साथ# #साक्षी पुरावे देऊनही देवरी पोलिसांची कारवाई शून्य# #महाजनादेश यात्रेत ओबीसी आरक्षण पुर्ववत करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा हवेतच विरली

गोंदिया जिल्ह्यातील वनहक्क जमिनीचे दावे पंधरा दिवसात निकाली काढा- राजकुमार बडोले

गोंदिया,दि:११.: गोंदिया जिल्ह्यातील वन हक्क जमिनीचे दावे येत्या पंधरा दिवसात निकाली काढा असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी आज ११ जून रोजी संबंधित विभागाला दिले.
अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी अधिनियमांतर्गत वन हक्क जमिनीवर दावा केलेल्या प्रकरणांची आढावा बैठक आज ११ जून रोजी मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी त्यांनी उपरोक्त निर्देश दिले.
श्री. बडोले पुढे म्हणाले, गोंदिया जिल्हास्तरीय वनहक्क समितीकडे प्रलंबित असलेले ५०६ आणि उपविभागीय पातळीवर असलेले २८ दावे येत्या पंधरा दिवसात निकाली काढावेत. याशिवाय ज्या कास्तकारांनी अपिल दाखल केले नाही, त्यांनाही तातडीने अपिल दाखल करावयास सांगावे तसेच नामंजूर करण्यात आलेले दावे विशेष मोहिम घेऊन निकाली काढावेत. त्यासाठी जुलै अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात यावी. त्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात यासंबंधिचा आढावा घेण्यात यावा असेही श्री. बडोले यांनी सांगितले.
ज्यांना वन जमिनीचे पट्टे मिळाले त्यांना कर्जमाफी, पीक कर्ज, विहीर, सोसायटीचे कर्ज अशा कोणत्याही योजनांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित रहावे लागते. इनाम जमिनी प्राप्त झालेल्या शेतकऱ्यांना ज्या प्रकारे सर्व शासकिय योजनांचा लाभ मिळतो त्याप्रमाणेच गोंदिया जिल्ह्यातील वन हक्क जमिनीप्राप्त आदिवासी शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी स्वतंत्र परिपत्रक आदिवासी विभागाने निर्गमित करावे, असेही निर्देश श्री. बडोले यांनी दिले.
यावेळी वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, आदिवासी विभागाचे उपसचिव सुनिल पाटील, मुख्य वनसंरक्षक श्री. तिवारी, गोंदियाचे उपवनसंरक्षक एस. युवराज, अप्पर प्रधान मुख्य संरक्षक, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. गेडाम आदी अधिकारी उपस्थित होते.

Share