नाली बांधकामासाठीच्या अतिक्रमण हटाव मोहिमेत भेदभाव

0
38

गोंदिया,दि.१२-गोंदिया नगर पालिकेच्यावतीने शहरात विविध विकासकामांचा पावसाळ्यापुर्वी धमाका सुरु आहे.त्यातच नाल्याबांधकामांना प्राधान्य देण्यात आले आहे.गेल्यावर्षी झालेल्या मुसळधार पावसात वार्ड क्रमांक ९,१० मध्ये मोठी समस्या निर्माण झाली होती.त्यातच चौरागडे मेडीकल चौकातून एक व्यक्ती पुरात वाहून गेल्याचा प्रकार घडला होता.यापाश्र्वभूमिवर या प्रभागातील नगरसेवकांनी नगरपालिकेकडे रस्ता रुंदीकरणासह नालीबांधकामाचे प्रस्ताव सादर केले होते.त्यानुसार चौरागडेमेडीकल चौक ते गजानन मंदीर कॉलनीपर्यंत हाती घेण्यात आलेल्या नाली बांधकामात मोठ्याप्रमाणात अनिमितता दिसून येत आहे.नाली बांधकामासाठी नगरपालिका बांधकाम विभागाच्यावतीने पुर्वीचा पांदण रस्ता असलेला परंतु नकाश्यात कुठेच रस्त्याचा उल्लेख नसलेल्या ठिकाणी सद्या रस्ता रुंदीकरण व नालीबांधकाम करण्यात येत आहे.याठिकाणी चौरागडे मेडीकलपासून २०० ते ३०० मीटरपर्यंतचा रस्ता हा सरळ आहे,त्यानंतर वळणरस्ता हा शिवनगर फलक असलेल्या ठिकाणी दिसून येते.त्याठिकाणी नालीबांधकाम करतांना नगरपालिका बांधकाम विभागाने वळणरस्तावर ५० फुटाचा रस्ता होते की नाही हे नपातपासता नालीबांधकाम केले.मात्र त्यानंतर नालीबांधकाम करतांना बिसेन यांच्या प्लाटपासून ते चौरागडे मेडीकल पर्यंत ५०फुटाचा रस्ता व ३ फुटाची नाली हे ब्रिद घेत बांधकामाला सुरवात केली.त्यामध्ये महेंद्र बघेले व चौरागडे मेडीकल यांचे पक्के बांधकाम अतिक्रमण असल्याचे सांगत ते पाडण्यास भाग पाडले आणि त्यांनी ते पाडलेही.परंतु शिवनगरचा फलक असलेल्या ठिकाणी जिथे वळणरस्ता आहे तिथेच यांनी पक्का बांधकाम असलेल्या ठिकाणी अतिक्रमण पुर्ण का काढले नाही अशा प्रश्न काही नागरिकांनी उपस्थित करीत नगरपालिका व लोकप्रतिनिधींनी हेतूपुरस्सर व राजकीय द्वेषातूनच बघेले व चौरागडे यांचे बांधकाम पाडण्यासाठी खटाटोप केल्याचा आरोप होऊ लागला आहे.डोलारे सिमेंट एजंसीचा असलेला बांधकाम त्यांच्या मालकीच्या जागेत आहे का याचीही चौकशी करुन त्याठिकाणी सुध्दा करण्यात आलेल्या नालीचे बांधकाम व रस्त्ता ५० फुटाचा आहे का याची चौकशीची मागणी पुढे येऊ लागली आहे.नालीबांधकामाच्या नावावर भेदभाव करुन अन्याय करण्यात आल्याचा सुर उमटत असून हे नालीबांधकाम गेल्या जानेवारीमहिन्यापासून सुरु आहे जे पावसाळा यायची वेळ आली तरी पुर्ण होण्याचे नाव घेईना.