मित्सुबिशी इलेक्ट्रिक इंडियाद्वारे गोंदियात एमईक्यु हिरोबा एअर कंडीशनर्सच्या संकल्पनेवर आधारित शोरूमचा शुभारंभ

0
14

गोंदिया ,दि.१२- :मित्सुबिशी इलेक्ट्रिक, ह्या प्रिमियम एअर कंडीशनर्समधील जागतिक पातळीवरील आघाडीच्या कंपनीने रहिवासी वापरासाठीच्या विशिष्ट ‘संकल्पना शोरूमङ्क पद्धतीच्या विशेष एअर कंडीशनर्स शोरूमचे उद्घाटन गणेश नगर, गोंदिया ४४१६०१ येथे प्रसिद्ध चॅनल भागीदार विकास रेफ्रिजरेशनसोबत केले आहे. ह्या विशेष शोरूमला एमईक्यु हिरोबा म्हंटले जाईल व त्यामध्ये मित्सुबिशी इलेक्ट्रिकच्या विविध श्रेणीतील अतिशय उच्च तंत्रज्ञान व टिकाऊपणा असलेली वाजवी दराधील उत्पादने उपलब्ध असतील. मित्सुबिशी इलेक्ट्रिक गुणवत्ता (एमईक्यु) मध्ये आमच्या उत्पादने, सेवा, भागीदारी आणि लोक ह्यामधील सर्वोत्तम अनुभव देण्यासाठीची गुणवत्ता तपासली जाते. जपानीमध्ये हिरोबाचा अर्थ लोकांनी एकत्र येण्याची सार्वजनिक जागा, हा असतो आणि एमईक्यु हिरोबा हा असा मंच राहील जिथून नवीन तंत्रज्ञानांची घोषणा केली जाईल.
मित्सुबिशी इलेक्ट्रिक इंडियाचे (एमईआय) डायरेक्टर आणि बिजनेस युनिट हेड, एअर कंडीशनर्स श्री योज़ो इतो ह्यांनी म्हंटले, ‘ग्राहकांना मित्सुबिशी इलेक्ट्रिक उत्पादनांना बघून त्यांचा स्पर्श अनुभवण्यास प्रोत्साहन देण्यासाठी; मित्सुबिशी इलेक्ट्रिक एअर कंडीशनिंगची उत्पादने प्रदर्शित करण्यासाठी आणि त्यांच्या विक्रीसाठीच्या अशा विशेष शोरूम्स असतील. ह्यामुळे एक प्रिमियम एअर कंडीशनिंग ब्रँड म्हणून मित्सुबिशी इलेक्ट्रिकची विजिबिलिटी वाढण्यास मदत होईल. ह्या विशेष शोरूम्समध्ये मित्सुबिशी इलेक्ट्रिक उत्पादनांची संपूर्ण श्रेणी प्रदर्शित केली जाईल ज्यामध्ये रूम एअर कंडीशनर्स, पॅकेज्ड एअर कंडीशनर्स, सिटी मल्टी व्हीआरएफ सिस्टीम्स आणि जेट टॉवेल्स ह्यांचा समावेश सेल.ङ्क
आजवर मित्सुबिशी इलेक्ट्रिकने भारतामध्ये १२५ पेक्षा जास्त विशेष शोरूम्स भारतात सुरू केल्या आहेत आणि ह्या आर्थिक वर्षामध्ये भारतामध्ये आपल्या ब्रँडच्या अधिक व्यापक प्रसारासाठीच्या कार्यक्रमाचा भाग म्हणून अशा विशेष शोरूम्स देशभरात सुरू करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.
रहिवासी, कमर्शिअल आणि औद्योगिक वापराच्या एअर कंडीशनिंग सिस्टीम्समध्ये मित्सुबिशी इलेक्ट्रिक अनेक दशकांपासून जगात आघाडीवर आहे. अँटी एलर्जी एंझायम फिल्टर, ऑटो रिस्टार्ट, इको- फ्रेंडली, हाय सीएफएम अशी ह्या उद्योगातील आघाडीची वैशिष्ट्ये त्यांच्याकडे आहेत व त्यामुळे गुणवत्ता, नेमकेपणा व सर्वांत वेगवान कूलिंग हे परिणाम मिळतात. विशेष शोरूम्सशिवाय मित्सुबिशी इलेक्ट्रिक सुमारे ८५० स्पेशालिस्ट विक्री व सेवा डीलर्स (एसएसडीज) आणि १००० पेक्षा जास्त मल्टी ब्रँड आउटलेटससह देशभरामध्ये कार्यरत आहे.

मित्सुबिशी इलेक्ट्रिक, इंडियाचे (एमईआय) सिनियर जनरल मॅनेजर- लिव्हिंग एनवायरनमेंट श्री. नीरज गुप्ता ह्यांनी म्हंटले आहे, ‘भारतातील अनेक ग्राहक आजही विकत घेण्याआधी उत्पादनांची चाचणी घेऊन बघण्यास प्राधान्य देतात. मोठ्या संख्येने असे ग्राहक असतात ज्यांना कोणाशी तरी व्यक्तिगत प्रकारे बोलायचे असते. एमईक्यु कूलिंग प्लॅनेटस ही वैशिष्ट्यपूर्ण संकल्पना आहे, कारण तिथे निर्णय घेण्याच्या आधी ग्राहकांना स्टोअरला भेट देण्यास, उत्पादन बघण्यास व मग निर्णय घेण्यास प्रोत्साहन दिले जाते. तसेच, एमईक्यु हिरोबामध्ये ग्राहकांना एअर कंडीशनिंगच्या क्षेत्रातील संपूर्ण माहिती दिली जाते.ङ्क
‘उच्च प्रशिक्षित सेवा व देखभाल कर्मचा-यांसह आमच्या भक्कम सेवा नेटवर्कद्वारे आम्ही ग्राहकांना अतिशय अपूर्व अशी सेवा प्रदान करण्यासाठी कटिबद्ध आहोत. सध्या एअर कंडीशनर्सच्या संदर्भात काही असेल तर ग्राहक १८०० १०२ २६२६ वर संपर्क करू शकतात व आमचा सेवा विभाग त्यांना उत्तर देईल व अगदी थोड्या वेळेत त्यांच्या समस्येचे समाधान करण्यासाठी तत्पर असेल,ङ्क त्यांनी पुढे म्हंटले.

मित्सुबिशी इलेक्ट्रिक इंडियाविषयी (एमईआय):
विश्वसनीय, उच्च गुणवत्तेच्या उत्पादनांच्या सेवेमध्ये सुमारे १०० वर्षांचा अनुभव असलेली मित्सुबिशी इलेक्ट्रिक कॉरपोरेशन (ढजघधज:६५०३) ही माहितीवरील प्रक्रिया व कम्युनिकेशन्स, स्पेस डेव्हलपमेंट आणि सॅटेलाईट कम्युनिकेशन्स, ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स, औद्योगिक तंत्रज्ञान, ऊर्जा, परिवहन व उपकरण बांधणी ह्यांच्या निर्मिती, मार्केटिंग व विक्रीमध्ये जागतिक पातळीवरील अग्रणी कंपनी म्हणून ओळखली जाते. ‘चेंजेस फॉर द बेटरङ्क (चांगल्यासाठी बदल) ह्या आपल्या कॉरपोरेट विधानाच्या भावनेला अनुसरून व ‘इको चेंजेसङ्क (पर्यावरण अनुकूल बदल) ह्या पर्यावरण विधानेला अनुसरूम मित्सुबिशी इलेक्ट्रिकद्वारे समाजाला तंत्रज्ञानासह समृद्ध करणारी जागतिक आघाडीची हरित कंपनी बनण्याचे उद्दिष्ट ठेवले गेले आहे. कंपनीने ३१ मार्च २०१८ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये ४,३३१.१ अब्ज येन (णड ४१.८ अब्ज*) इतकी एकत्रित ग्रूपची विक्री कंपनीने नोंदवली होती.

भारतातील मित्सुबिशी इलेक्ट्रिक कंपनी आता वाढली आहे व भारतीय मार्केटमध्ये नावीन्यपूर्ण व व्यापक गुणवत्तेच्या विविध उत्पादनांना कंपनीने आणली आहे. त्यामध्ये एअर कंडीशनर्स, ऑटोमोटीव्ह उपकरण, एलेव्हेटर्स व एस्केलेटर्स, फॅक्टरी ऑटोमेशन आणि औद्योगिक प्रणाली, हायड्रोनिक्स आणि व्यावसायिक एअर कंडीशनर्स, पॉवर सिस्टीम्स, फोटोव्होल्टीक सोल्युशन्स, सेमीकंडक्टर व उपकरणे, परिवहन प्रणाली व व्हिज्युअल व इमेजिंग संबंधित उत्पादने व सोल्युशन्सचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी इथे भेट द्या:
हींीं:ि//ळप.ार्ळींीीलळीहळशश्रशलींीळल.लो/शप/ळपवशु.रिसश
* ३१ मार्च २०१८ रोजी टोक्यो फॉरेन एक्स्चेंज मार्केटने दिलेल्या १ अमेरिकन डॉलरसाठी १०६ येन ह्या विनिमय दरानुसार