३७१ उपाययोजनांच्या कामांना मान्यता, चार तालुक्यातील २८५ गावे/वाड्यांचा समावेश

0
14

गोंदिया,दि.१२: जिल्ह्यातील आमगाव, गोरेगाव, तिरोडा व सडक/अर्जुनी तालुक्यातील २८५ गावे आणि वाड्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी टंचाईच्या ३७१ उपाययोजनांच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामधून विंधन विहिरींची विशेष दुरुस्तीची कामे घेण्यात येतील.
यामध्ये आमगाव तालुक्यातील टेकरी, तिगाव, कालीमाटी, बंजारीटोला, पानगाव, वळद, करंजी, पाउलदोना, भोसा, शिवनी, डोंगरगाव, नंगपुरा, धावडीटोला, सुरकुडा, मानेगाव, दहेगाव, खुर्शिपारटोला, बोरकन्हार. महारीटोला, येरमडा, गिरोला, टाकरी. तिरोडा तालुक्यातील सालेबर्डी, पिंडकेपार, पांजरा, नवेगाव/खुर्द, मुरपार, मुंडीपार, मंगेझरी, मांडवी, कोयलारी, खुरखडी, खैरबोडी, गराडा, चुरडी, चोरखमारा, बोरगाव, बोरा, भजेपार, बेलाटी/बु., बघोली, बरबसपुरा, मेंदीपूर, जमुनिया, डब्बेटोला, पुजारीटोला, मरारटोला, परसवाडा, बिरोली-सोनोली, करटी बु., करटी खु., धादरी, खमारी, पिपरीया, सावरा-बोंडराणी, बिहिरीया, माल्ही, सिल्ली (निलागोंदीटोला), मलपुरी, चंदोरी, बेरडीपारटोला, नहरटोला, खैरलांजी, चिखली, अर्जुनी (टाकीटोला), बिरसी, घाटकुराडा, सेजगाव, निमगाव, ठाणेगाव, सरांडी, भिवापूर (ढिवरटोला), केसलवाडा, आलेझरी, सुकळी, लोणारा, बोपेसर, मुंडीकोटा, सर्रा, सतोना, लाखेगाव, विहिरगाव, गोंडमोहाडी, चंदोरी/खुर्द, बेरडीपार (सिंदीटोला), वडेगाव, मेंढा, चिरेखनी, कवलेवाडा ढिवरटोली, मारेगाव, घोगरा भिमनगर पाटीलटोला, भंभोडी, येडमाकोट, लेदडा, बोदलकसा, इंदोरा/खु., खडकी, डोंगरगाव.
गोरेगाव तालुक्यातील हिरडामाली, पिंडकेपार, कन्हारटोला, सिलेगाव, पालेवाडा, बोरीटोला, हेटीटोला, गोंदेखारी, सोनेगाव, नवरगाव, मेंगाटोला, पटभरीटोला, हौसीटोला, चांगोटोला, बघोली, बोरगाव, सुखपूर, तेलनखेडी, आकोटोला, मिर्झागडटोली, मुंढरीटोला, बबई, बबईटोला, घुमर्रा, कलपाथरी, महाजनटोली, चोपा, बाजारटोला, हिराटोला, कॉलेजटोली, कालीमाटी, घुबोटोला, आंबेतलाव, आंबेतलावटोला, चिचगाव, चिचगावटोला, कमरगाव, दवडीपार, दवडीपारटोला, मोहाडी, घोटनटोली, इंद्रप्रस्थनगर, गणखैरा, गणखैराटोला, संग्रामटोली, खाडीपार, चोपनटोली, चिल्हाटी, सलगटोला, टेंभरेटोली, मुरदोली, गराडा, जांभुळपाणी, सोदलागोंदी, मुंडीपार, सलगंटोला, कवलेवाडा, इसाटोला, डोंगरुटोला, कवळीटोला, सोनी, नोनीटोला, स्कूलटोली, बाम्हणी, बाम्हणीटोला, बोटे, पुरगाव, हरिजनटोली, स्कूलटोली, मोहगाव, बोरीटोला, धुंदाटोला, डव्वा, डव्वाटोली, गोवारीटोला, तिमेझरी, ससाकरणटोली, कुलबीटोली, गोंडीतिमेझरी, कटंगी बु., चंद्रपूरटोली, शहारवानी, धानुटोला, मोहगाव/ति., मुसीबतनगर, तुमखेडा बु., स्कूलटोली, ढिवरटोली, मलपुरी, रामाटोला, तेढा, महाजनटोला, सोनुटोला, हलबीटोला, इंदिरानगर, तिल्ली/मोह., गौरीटोला, परसाडीटोला, बालामहाजनटोला, तुमसर, खोसटोला, आडकुटोला, गोंडीटोला, आनंदनगर, गिधाडी, कवळीटोला, कॉलेजटोली, मीलटोली, म्हसगाव, देउटोला, घोटी, गयलाटोला, जानाटोला, कुऱ्हाडी, चौकीटोला, आसलपाणी, बोळुंदा, स्कूलटोली, संग्रामपूर, बाळबंद, पाथरी, भुताईटोला, संजयटोला, निंबा, तानुटोला, हलबीटोला, गोवारीटोला, पठाणटोला, नवाटोला, पिपरटोला, कन्हारटोला, चिचटोला, शिवटोली, भडंगा, बसटोली, तेलीटोली, झांजिया.
सडक/अर्जुनी तालुक्यातील खजरी, परसोडी, चिरचाडी, कोहळीटोला, कन्हारपायली, सौंदड, बोपाबोडी, गिरोला, हेटी, घाटबोरी/ते., घाटबोरी/को., ब्राम्हणी/स., बौध्दनगर, सितेपार, धानोरी, मुंडीपार/ई., घटेगाव, म्हसवानी, गोपालटोली, पळसगाव/ड., मुरपार/रा., भुसारीटोला, दोडके/जा., डोंगरगाव/ख., वडेगाव, सावंगी, फुटाळा, कोकणा/ज., खोबा, कनेरी/रा., कोसबी, राजगुडा, पांढरी, रेंगेपार, खाडीपार, घोटी, मुरपार/ले., कोदामेंडी, पांढरवानी, रेंगेपार/द., उसीखेडा, शेंडा, कोयलारी, पुतळी, बाम्हणी/ख., खडकी, चिखली, राका, पळसगाव/रा., कोहमारा अशा एकूण २८५ निश्चित केलेल्या ठिकाणी १५ लक्ष ८९ हजार रुपयांमधून विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती करण्यात येणार आहे. असे जिल्हाधिकारी गोंदिया यांनी कळविले आहे.