गोठयाला लागलेल्या आगीत अडीच लाखाचे नुकसान

0
15

गोरेगाव,दि.1४: येथील जुन्या वस्तीतील रहिवासी गुलाब कटरे व संजय कटरे यांच्या गोठ्याला अचानक गुरूवारी सकाळी ९.३० वाजता लागलेल्या आगीमुळे अडीच लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.या आगीत ४० पाईप, ट्रॅक्टरचे टायर व तणस जळून खाक झाली. आग एवढी भिषण होती की आगीला आटोक्यात आणण्यासाठी नगरपंचायतच्या अग्नीशमन कर्मचाऱ्यांना तब्बल चार तास प्रयत्न करावे लागले. या आगीमुळे जवळपास अडीच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.आगीची माहिती मिळताच नगराध्यक्ष इंजी. आशीष बारेवार,उपाध्यक्ष सुरेश रहांगडाले,बांधकम सभापती हीरालाल रहांगडाले,नगरसेवक रेवेंद्र बिसेन,सामाजिक कार्यकर्ते रेखलाल टेंभरे आदीनी धाव घेतली व आग आटोक्यात आणण्यासाठी सहकार्य केले.नगर पंचायतीचे कर्मचारी दीपक रहांगडाले, सुधीर कटरे ,पंकज बारेवार ,प्रवीण बारेवार, आशुतोष काबंले आदीनी अथक परिश्रम घेत आग आटोक्यात आणली ही आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र कळू शकले नाही.आगीच्या घटनेचा पंचनामा तलाठी जी.व्ही.गाढवे यांनी केला.शहरात कुठेही आगीची घटना घडल्यास नगरपंचायतीचे अग्निशमन वाहन विनाशुल्क पुरविले जाईल असे नगराध्यक्ष आशिष बारेवार यांनी सांगीतले.