मुख्य बातम्या:
ईव्हीएममुळे लोकशाही धोक्यात# #मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर, वाचा कुणाला मिळाले कोणते खात# #विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून २८ विधेयके मांडणार# #ट्रक-कारच्या धडकेत चार शिक्षक जखमी;बदली आदेश घेऊन जाताना अपघात# #रापम अधिकाऱ्यांच्या बचावासाठी तक्रारी गहाळ केल्या -नरेश जैन# #संघटनेशिवाय सामाजिक लढा अशक्य:- मनोहर चंद्रिकापुरे# #ग्राम विकास मंत्रालय व जिल्हा परिषद गोंदिया ने केली शिक्षकांची दिशाभूल# #मुख्याधिकाऱ्यास मारहाणप्रकरणी दोन माजी नगरसेवकांना ५ वर्षांचा सश्रम कारावास# #विजय वड्डेटीवर विधानसभेचे नवे विरोधी पक्षनेते, विरोधकांत एकमत# #मंत्रिमंडळ विस्ताराला सुरुवात; पहिल्या शपथेचा मान आयात नेत्यांना

बोगस कागदपत्राच्या आधारे घरकुल योजनेच्या 1 लाखाची उचल

डब्बेटोला येथील बेगनबाई रहांगडालेंच्या नावावर उचलले पैसे

गोदिया,दि.14ः- तिरोडा तालुक्यातील डब्बेटोला येथे घरकुल लाभार्थ्याच्या नावावर खोटे कागदपत्रे आणि फोटो अपलोड करुन तब्बल १ लाख २ हजार ८६ रुपयांची उचल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार  उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे ज्या लाभार्थ्याच्या नावावर या पैशाची उचल करण्यात आली त्यांनी यासंबंधीचे कागदपत्रे माहितीच्या अधिकारांतर्गत मागविल्यानंतर हा प्रकार उघकडकीस आला आहे.एकीकडे तिरोडा पंचायत समितीचा कारभार पारदर्शक असल्याचे देखावा केला जात असताना त्यात हा प्रकार म्हणजे दिव्याखाली अंधार अशी म्हणण्याची वेळ आली आहे.हा प्रकार उघडकीस आल्यानंतर बेगनबाई रहांगडाले यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याची जिल्हाधिकारी अधिकारी आणि मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली.तसेच सदर प्रकरणाची माहिती प्रसारमाध्यमांनाही दिली.
तालुक्यातील डब्बेटोला येथील बेगनबाई सेवकराम रहांगडाले यांना पंचायत समिती अंतर्गत सन २०१६-१७ मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत घरकुल मंजूर करण्यात आले. त्याचा नोंदणी क्रमांक एमएच २२०१५९१ हा आहे. ज्यावर्षी त्यांना घरकुल मंजूर झाले त्यावेळेस फाईल तयार करायची आहे असे सांगून ग्रामपंचायतच्या एका जबाबदार पदाधिकाऱ्याने त्यांच्याकडून आधारकार्ड, बँक पास बुक, घर टॅक्स पावती तसेच इतर कागदपत्रे घेवून गेला.त्यानंतर बेगनबाई आणि तिचा मुलगा लोकचंद रहांगडाले यांनी संबंधित पदाधिकाऱ्याला याबाबत वांरवार विचारणा केली असता त्यांनी टाळाटाळ केली.त्यामुळे लोकचंद रहागंडालेने तिरोडा तहसील व पंचायत समिती कार्यालयात चौकशी केली. तेव्हा त्यांना तुमच्या आईच्या नावाने घरकुल बांधकाम झाले असून त्यासाठी ५ ट्रॅक्टर रेतीच्या रॉयल्टीची नोंद असल्याचे तेथील कर्मचाऱ्याने सांगितले. ही माहिती ऐकताच त्यांना धक्का बसला. त्यांनी अधिक चौकशी केली असता त्यांच्या नावावर घरकुल बांधकामासाठी तीन वेळा एकूण ९० हजार रुपयांची उचल करण्यात आल्याचे आढळले.
सदर पैसे त्यांच्या खात्यावर जमा झाले नसून दुसºयाच व्यक्तीच्या नावावर जमा करुन उचल करण्यात आली. तसेच मस्टर क्रमांक ५८०७, ६४८२, ८४७३ व्दारे अकुशलची रक्कम १२ हजार ५८६ रुपये सही करुन काढण्यात आली. अशा प्रकारे त्यांच्या नावावर एकूण १ लाख २ हजार ५८६ रुपयांची उचल करण्यात आली.विशेष म्हणजे बेगनबाई यांनी घरकुलाचे बांधकाम केले नसताना त्यांच्या नावावर बांधकाम केल्याचे दाखवून खोटी स्वाक्षरी करुन पैशाची उचल करण्यात आली आहे. त्यामुळे घरकुल बांधकाम प्रकरणाची सखोल चौकशी केल्यास बराच घोळ पुढे येण्याची शक्यता आहे.
डब्बेटोला येथील बेगनबाई रहांगडाले या घरकुल लाभार्थ्याची दिशाभूल करुन त्यांच्या नावावर पैशाची उचल करणाऱ्या संबंधित पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करुन फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावे. तसेच त्यांच्या नावावर उचल करण्यात आलेली रक्कम परत करण्यात यावी. अन्यथा याविरुध्द न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा बेगनबाई व तिचा मुलगा लोकचंद रहांगडाले यांनी दिला आहे.

Share