राईस मिलची राख रस्त्याच्या कडेला,नागरीकांचे आरोग्य धोक्यात!

0
15

अर्जुनी मोरगाव,,दि.14ः-साझा 9 अंतर्गत येणारे सर्व्हे क्रमांक 288 , गणेशनगर परिसरात वडसा कोहमारा रोडच्या कडेला राईसमिल मधून निघणारी विषारी राख फेकण्याचा घाणेरडा प्रकार कुणी तरी राईसमिल मालकाने केला आहे. ही राख हवेसोबत रोडच्या दिशेने वाहत असते, लगतच लोकवस्ती आहे.या राखेत विषारी घटक असतात, यामुळे परिसरातील जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. रस्त्यावरून ऐजा करणाऱ्यांच्या डोळ्यात राख जाऊन डोळे निकामी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या कडक उन्हाळा सुरू असून तेज वादळ उठतात. वादळ इतके जोरात असतात की बारीक धूर ,मातीचे कन वातावरनात पसरतात. या वादळामुळे राखीचे बारीक कण हवेसोबत वातावरणात पसरतात ते परिसरातील नागरी वस्त्यांमध्ये जातात.येथील नागरिक या जीवघेण्या प्रकारामुळे त्रस्त आहेत.कित्येकांच्या डोळ्यात ही राख गेल्याने अंधत्व येण्याची वेळ त्यावर येऊ शकते.या राखेत विष्यारी घटक असतात त्याने त्वचेचे रोग होतात.या आधीही तावसी टोली परिसरात असाच प्रकार घडला होता.त्यामध्ये इटखेडा येथील अनेकांना डोळ्यांचे आजार झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
राईसमिलची घाण या प्रकारे लोकवस्ती जवळ टाकता येत नाही. या घाणीची व्यवस्था स्वतः मिल मालकाने करायची असते, मात्र पैसे वाचविण्यासाठी केलेला हा प्रकार निंदनीय आहे.
राख टाकण्यात आलेली जागा ही समाज कल्याण विभागाच्या वस्तीगृहासाठी प्रस्तावित आहे.बाजूला लागूनच हनुमान मंदिर व बुद्ध विहार आहे.या दोन्ही ठिकाणी हिंदू व बौद्ध बांधव सकाळी व सायंकाळी पूजाअर्चना करतात.हाकेच्या अंतरावर रेल्वे लाईन गेली आहे. ही राख या सर्वांना प्रभावित करीत असल्याची तक्रार आहे.सदर दूषित राख त्या ठिकाणाहून हलविण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
एकीकडे शासन पर्यावरण संरक्षण करण्यासाठी लाखो रुपये खर्च करतो.विवीध उपाय योजना करून जनजागृती केली जाते, तरीही असे प्रकार घडतात.याप्रकारे निष्काळजी पणा करणाऱ्या राईसमिल मालकांना प्रशासनाने धडा शिकवन्याची गरज आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होणाऱ्या या प्रकारावर नगरपंचायत,पर्यावरण विभाग काय कारवाई करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.