आदिवासी मुला/मुलींचे शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज आमंत्रित

0
54

गोंदिया,दि.१५ : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी अंतर्गत जिल्ह्यात मुला/मुलींचे एकूण १९ शासकीय वसतिगृह कार्यरत असून सन २०१९-२० या शैक्षणिक सत्राकरीता आदिवासी मुला/मुलींच्या शासकीय वसतिगृहात ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहे. जिल्ह्यातील वसतिगृहामध्ये कनिष्ठ महाविद्यालय ते पदवी, पदव्युत्तर, व्यावसायिक अभ्यासक्रमाकरीता आणि तालुकास्तरीय वसतिगृहांमध्ये इयत्ता आठवी ते पदवी, पदव्युत्तर, व्यावसायिक अभ्यासक्रमाकरीता निकाल जाहीर झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसाचे आत ऑनलाईन अर्ज करावेत. तसेच ज्या विद्यार्थ्यांना जिल्हास्तरावरील पदवी, पदव्युत्तर, व्यावसायिक अभ्यासक्रमाकरीता तसेच तालुकास्तरीय विद्यार्थ्यांना बारावी नंतर मान्यता प्राप्त तंत्र शिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयामध्ये केंद्रीभुत प्रवेश प्रक्रियाद्वारे प्रवेश घेतलेले असलेल्या विद्यार्थ्यांनी वसतिगृहाकरीता ऑनलाईन अर्ज करायचा नसेल तर विद्यार्थी पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेअंतर्गत थेट ऑनलाईन अर्ज करु शकतात. वसतिगृह प्रवेशाकरीता ऑनलाईन रिक्त जागेच्या अधिन राहूनच प्रवेश देण्यात येईल. ज्या विद्यार्थ्यांचा वसतिगृहात प्रवेश होणार नाही अशा विद्यार्थ्यांना पंडीत दिनदयाल स्वयंम योजनेअंतर्गत वळती करण्यात येणार आहे. परंतू त्याकरीता विद्यार्थ्यांनी ऑनलाईन वसतिगृहाचा अर्ज करतांनाच पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना निवड करणे अनिवार्य आहे, असे न केल्यास वसतिगृह प्रवेशापासून आणि पंडीत दिनदयाल उपाध्याय योजनेपासून वंचित राहिल्यास विद्यार्थी स्वत: जबाबदार राहील.
आदिवासी मुला/मुलीचे वसतिगृहात रिक्त असलेल्या जागेकरीता ऑनलाईन प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहे. सदर वसतिगृहात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी/विद्यार्थीनींनी शैक्षणिक सत्र २०१९-२० करीता विहित मुदतीत पात्र परीक्षेचा निकाल जाहिर झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसापर्यंत हींींीि://ीुरूरा.ारहरेपश्रळपश.र्सेीं.ळप या संकेतस्थळावर आपला णीशी खव व रिीीुेीव तयार करुन ऑनलाईन अर्ज करुन अर्जाची प्रिंट त्या त्या वसतिगृहात सादर करुन पोचपावती घेण्यात यावी. ज्या अभ्यासक्रमांचे निकाल अद्याप जाहिर झालेले नसेल अशा विद्यार्थ्यांनी निकाल जाहिर झाल्यापासून १५ दिवसाच्या आत ऑनलाईन अर्ज करावेत. वसतिगृहात जुन्या विद्यार्थ्यांनी सुध्दा ऑनलाईन अर्ज करणे अनिवार्य आहे. जुन्या विद्यार्थ्यांनी निकाल जाहिर झाल्यापासून १५ दिवसाच्या आत महाविद्यालयामध्ये प्रवेश घेवून वसतिगृहाचा ऑनलाईन अर्ज वसतिगृहात सादर करावा. असे न केल्यास सदर विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला असे समजून त्यांचे जागी नविन विद्यार्थ्यास प्रवेश दिला जाईल, याची संबंधित विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
वसतिगृहासाठी अर्ज भरतांना ऑनलाईन प्रणालीमध्ये अपलोड करण्यासाठी आवश्यक सर्व कागदपत्रे (उदा. मागील वर्षी मिळालेले गुणपत्रिका, जात प्रमाणपत्र क्रमांकासहीत, टी.सी. चालू वर्षी प्रवेश घतलेल्या शाळा/महाविद्यालयाचे बोनाफाईड/प्रवेश पावती, आधार कार्ड, अर्जदाराचे राष्ट्रीयकृत बँकेतील आधार संलग्न खात्याचे पासबुक झेरॉक्स, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, वैद्यकीय दाखला) व इतर आवश्यक कगदपत्रे. अधिक माहितीसाठी आपल्या नजिकच्या वसतिगृहाशी संपर्क साधावा. असे प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, देवरी यांनी कळविले आहे.