गोंदिया शहरात उद्या ग्लोबल रीच-परदेश अभ्यास मार्गदर्शिकेचे आयोजन

0
18

गोंदिया,दि.१५ः- पुर्व भारतातील परदेश शिक्षण क्षेत्रात सल्लागार म्हणून काम करणाèया ग्लोबल रीच वतीने गोंदिया शहरासह जिल्ह्यातील युवक-युवतींना परदेशात शिक्षण घेण्यासाठी लागणाèया सोयीसुविधांची माहिती व अभ्यासक्रमाची निवड कशी करावी या विषयावर उद्या रविवारला(दि.१६)येथील होटल पॅसिफिक येथे सकाळी ११ ते सायकांळी ५ वाजेपर्यंत निशुःल्क मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेच्या वरिष्ठ सल्लागार डॉ.अश्विनी नाशिककर व आनंद गुल्हाने यांनी दिली.येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत माहिती देतांना डॉ.नाशिककर म्हणाल्या की,परदेशात शिक्षणासंबधी सर्व संधी आणि माहिती देण्यासाठी महाराष्ट्रातील विद्याथ्र्यामध्ये परदेशी शिक्षणाप्रती आवड निर्माण व्हावी यासाठी काम करीत आहोत.गेल्या २६ वर्षापासून सातत्याने हे काम सुरु आहे.आस्ट्रेलिया,न्युझीलंड,युएसए.यु.के,कॅनडा,आर्यलंड,दुबई आणि इतर बèयाच युरोपियन देशामध्ये अभ्यास करम्यासाठी आम्ही अर्जाची प्रकिया,विद्यापीठ निवड,बँकामार्फेत शिक्षण कर्ज कसे मिळविता येईल याबद्दल मार्गदर्शन करतो.गोंदिया जिल्ह्यातील युवकांना सुध्दा परदेश शिक्षणाची संधी मिळावी यासाठी या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले असून विद्यार्थी,विद्यार्थिनीनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन त्यांनी केल आहे.