नवीन मालमत्ता कराबाबत नागरिकांमध्ये रोष

0
12

देवरी,दि.१५ : शहरातील लोकांच्या मालकीचे ईमारत जमिनी अथवा भाडेकरुन कडून त्यांच्या मालमत्तेची व जागेवरची मोजणी व तपासणी करुन त्यावर योग्य मूल्य कर निर्धारण करुन याची प्रस्तावित यादी नगरपंचायत ने ३ जून रोजी प्रसिद्ध केली आणि लोकांना नोटीस ही दिल्या. यात त्यांना नियमित येणाऱ्या मामलत्ता करापेक्षा १० ते १५ पट जास्त कर लावण्यात येत असल्याने या विषयी लोकांमध्ये कमालीचा असंतोष निर्माण होत आहे. यावर नगरपंचायतने या नवीन कराविषयी आक्षेप नोंदविण्याकरिता येथील व्यापारी व प्रतिष्ठित नागरिकांची सभा बुधवारी (दि.१२) नगरपंचायतच्या सभागृहात घेतली.
या सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष कौशल कुंभरे होत्या. याप्रसंगी उपाध्यक्ष आफताब शेख, मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे, सर्व नगरसेवक, महाराष्टदृ प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी सहषराम कोरोटे, तालुका राष्टदृवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा स्विकृत नगरसेवक महेशकुमार जैन, तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष राधेश्याम बगडीया, व्यापारी नरेंद्र जैन, संपतलाल अग्रवाल, दीपक अग्रवाल, अ‍ॅड. प्रशांत संगीडवार यांच्यासह शहरातील सर्व व्यपारी व प्रतिष्ठित नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
या सभेत प्रस्तावित नवीन मालमत्ता कर या संबंधात चर्चा करुन शासनाच्या निकष व येथील लोकांच्या उत्पन्नाच्या आधारे नवीन कर लावावा या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी नगराध्यक्ष कुंभरे, उपाध्यक्ष शेख व मुख्याधिकारी चिखलखुंदे यांनी लोकांना सांगितले की, ही नवीन कराची प्रस्तावित यादी व नोटीस लोकांच्या माहिती करिता देण्यात आली असून यावर लोकांच्या ईमारती व जागेचे मुल्यमापन बरोबर झाले किंवा नाही आणि नवीन कराबाबत आपले आक्षेप मागविण्याकरिता दिले आहे.
तसेच नगरपंचायतचे सर्व पदाधिकारी स्थानिक असल्याने येथील लोकांवर कुठल्याही परिस्थितीत जास्त प्रमाणावर नवीन कर न लावता शासनाच्या निकषाप्रमाणे कर लावण्यात येईल असे सांगितले. आभार चिखलखुंदे यांनी मानले.